शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
“काँग्रेस सोबतच्या युपीएचं काय झालं? इतर पक्षांवर टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना सांगा की, नवाब मलिकांवर बोला. सेनेची भूमिका काय ते बोला, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. काश्मीर फाइल्सला कर माफीसाठी ठाकरे सरकार तयार नाही. शिवसेनेने नाव बदलून मुस्लिम लीग असं नाव ठेवावं, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
होळीच्या निमित्ताने ठाकरे सरकारची नवी नियमावली
‘काश्मीर फाइल्स’चे तिकीट दाखवून पुण्यातील हॉटेलमध्ये जेवले १९०० ग्राहक
नवाब मलिकांना दणका; ईडी फराझ मलिकला तिसरं समन्स पाठवणार
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन
न्यायालयाने नवाब मालिकांना दिलासा दिलेला नाही. तरीही हे सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही. हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालू आहे, असा घाणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर फाइल्स चित्रपटाचे प्रचारक असून भाजपवाले राजकीय अजेंडा राबवत आहेत, हे संजय राऊत यांचे विधान म्हणजे शिवसेना हिरवी होत असल्याचे निदर्शक आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. ही शिवसेना शिवसेनाप्रमुखांची नसून सोनिया मॅडम आणि जाणते पवार यांच्या रिमोटवर चालणारी शिवसेना आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.