शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज सकाळपासून गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
“भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ बोंबाबोंब करा हो, पण तिथे भगवा झेंडा नाचवू नका. हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. भगव्याचा इतका अपमान कुणी केला नसेल. कोविड काळात महाराष्ट्रात केलेला भ्रष्टाचार शिवसेना नेत्यांना पचणार नाही. तुरुंगात तर जावेच लागेल. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला नाही तर मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबाग मध्ये जमिनी कुठून आल्या?” असे सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत.
भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ बोंबाबोंब करा हो, पण भगवा झेंडा नाचवू नका तिथे. हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. भगव्याचा इतका अपमान कुणी केला नसेल.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
कोविड काळात महाराष्ट्रात केलेला भ्रष्टाचार शिवसेना नेत्यांना पचणार नाही. तुरुंगात तर जावेच लागेल.
संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला नाही तर मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबाग मध्ये जमिनी कुठून आल्या?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
“स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्या अपमानामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला नव्हता. पण भ्रष्ट संजय राऊत यांच्यावर कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली आहे,” अशी टीकाही अतुल भातखळकर यांनी केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्या अपमानामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला नव्हता….
पण भ्रष्ट संजय राऊत यांच्यावर कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
“करेक्ट कार्यक्रम सुरू झाला आहे आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही. ईडीचे अधिकारी ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत. घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत,” अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय. आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही….
ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत.
घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत. pic.twitter.com/6r8CHkUCJL— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
हे ही वाचा:
मिराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत ‘उचलले सोने’
अविनाश भोसलेचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयने आणले जमिनीवर
तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच
यंदा राखी खरेदीसाठी बहिणींना मोजावे लागणार ज्यादा पैसे
ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज ईडीचं पथक थेट संजय राऊत यांच्या घरी पोहचलं आहे.