मी तुरुंगात जायला तयार आहे, हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती तर…

मी तुरुंगात जायला तयार आहे, हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती तर…

शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर महाराष्ट्रात या प्रकरणावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेते या कारवाईनंतर संजय राऊतांवर तुटून पडले आहेत. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

मंगळवार, ५ एप्रिल रोजी संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली आहे. संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट तसेच अलिबाग येथील ८ जमिनींवर ईडीने टाच आणली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील पैसा वापरून हे मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप राऊत कुटूंबियांवर आहे.

हे ही वाचा:

…म्हणून वृद्ध महिलेने आयुष्यभराची जमापुंजी केली राहुल गांधींच्या नावावर

संजय राऊतांची मालमत्ता ईडीकडून जप्त

संजय राऊतांच्या कष्टाची कमाई कोट्यवधींची

केमिकल इंजीनियर अब्बासीने केला गोरखपूर मठाच्या सुरक्षा जवानांवर हल्ला

या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईवरून भाजपा नेते आक्रमक होत त्यांच्यावर टीकास्त्र डागत आहेत. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊतांवर तोफ डागली आहे.
“मी तुरुंगात जायला तयार आहे, हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती तर…” असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

तर एव्हढे दिवस चाललेल्या जळफळाट, थयथयाट, आदळआपट, शिव्यांची लाखोली यांचं मूळ कारण हे होतं तर….असा टोला भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लगावला आहे. भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

Exit mobile version