पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला होता. वीर सावकरांच्या कवितेला चाल लावली आणि ते गाणं सादर केल्यामुळे हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीमधील नोकरी गमावावी लागली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केला होता. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी कधी आकाशवाणीत नोकरीच केली नसल्याचे म्हटले. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी त्यांना आकाशवाणीमधील नोकरी गमवावी लागल्याची घटना सांगितली आहे. वीर सावकरांच्या ‘ने मजसि ने परत मातृभूमीला’ कवितेला चाल लावली आणि सादर केली त्यानंतर आपल्याला आकाशवाणीमधून मेमो देण्यात आल्याचे त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
यावरून अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खोट बोलतायत की संजय राऊत हे उघड करणारा हा व्हिडीओ आहे. ही माहिती पंडित हृदयनाथ यांनी उघड केली आहे. मात्र, तेही खोट बोलत आहेत असा दावा संजय राऊत करू शकतात. कारण काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी ते वाटेल ते बोलू शकतात, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
पंतप्रधान @narendramodi खोटं बोलतायत की संजय राऊत नेहमीप्रमाणे थापा मारतायत हे उघड करणारा हा व्हिडिओ पाहाच. ही माहिती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी उघड केली आहे. मात्र तेही खोटं बोलतायत असा दावा संजय राऊत करू शकतात. कारण काँग्रेसची जी हुजुरी करण्यासाठी ते वाट्टेल ते बोलू शकतात. pic.twitter.com/4Va5yKqo6h
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 10, 2022
हे ही वाचा:
पत्रकार राणा अय्यूब यांची १.७७ कोटी रक्कम ईडीने गोठवली
खबरदार ! रेल्वेच्या दिव्यांग डब्यातून प्रवास कराल तर…
लता दीदींच्या स्मारकावरून राजकारण नको, मंगेशकर कुटुंबियांचे आवाहन
भारत वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देणार?
काँग्रेसच्या राजवटीत हृदयनाथ मंगेशकर यांना सावरकरांच्या गीतांना चाली दिल्यामुळे आकाशवाणीतून काढले, ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत दिली. त्यानंतर ही माहिती खोटी असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता.