सलमान खुर्शीद यांनी आपल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदु समाजाबद्दल, हिंदुत्वाबद्दल आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्याविरोधात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी कडाडून टीका केली आहे.
भातखळकर यांनी यासंदर्भात जारी केलेल्या व्हीडिओत म्हटले आहे की, सलमान खुर्शीद यांनी रा. स्व. संघाविषयी आणि हिंदु समाजाविषयी जे अकलेचे तारे तोडले आहेत ती नेहरू घराण्याची विचारसरणी आहे. हेच नेहरू होते ज्यांनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला विरोध केला. त्याच इंदिरा गांधी होत्या ज्यांनी कायम रा.स्व. संघाला कडाडून विरोध केला. राहुल गांधी यांनी तर हिंदू दहशतवाद आहे असे अमेरिकन दुतावासाला सांगितले. सोनिया गांधी यांनी तर हिंदु दहशतवादाच्या नावाखाली खोटे आरोप करत हिंदुंना, रास्व संघाच्या लोकांना बॉम्बस्फोट प्रकरणात अडकवले.
सलमान खुर्शीद विसरले की, सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री असताना अशीच विधाने केल्यावर संसदेत माफी मागितली होती. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आरएसएस चे कौतुक केले होते. पण हिंदू समाजाचा आणि रास्व संघाचा द्वेष नेहरू घराण्याच्या रोमारोमात भिनला आहे. तोच सलमान खुर्शीद राहुल गांधींच्या सांगण्यावरून बाहेर काढत आहेत. जनतेने याला जोरदार उत्तर दिलेलेच आहे. येणाऱ्या काळात पुस्तकाविरोधात कायदेशीर कारवाई करू हे आम्ही सांगू इच्छितो.
हे ही वाचा:
गुजरातमध्ये हस्तगत केलेल्या ३०० कोटींच्या ड्रग्सचे मुंब्रा कनेक्शन
पाकिस्तानला ‘वेड’ लागायचेच राहिले बाकी…
‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’
आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, नेहरूंपासून काँग्रेसला असलेला हिंदू द्वेषाचा रोग सोनिया-राहुल यांच्या कारकीर्दीत चांगलाच बळावलाय. जात्यंध सलमान खुर्शीद याने उधळलेली मुक्ताफळे त्याचेच एक्सटेन्शन आहे. हा हिंदूविरोध काँग्रेसची कबर खणणार हे निश्चित.
‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या आपल्या पुस्तकात खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसीसी आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांबरोबर केली आहे. त्यावरून देशभरात संताप व्यक्त होतो आहे.