“राहुलजींनी गांधीच राहावं, सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये”

“राहुलजींनी गांधीच राहावं, सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोमवार, १३ जून रोजी चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी राहुल गांधी हे ईडी कार्यलयात दाखल झाले असून काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून निदर्शने करत आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजीही केली. ‘आय एम नॉट सावरकर; आय एम राहुल गांधी’, ‘राहुलजी संघर्ष करो हम आपके साथ है’ असे पोस्टर लावण्यात आले आहेत. यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखाळकर यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “राहुलजींनी गांधीच राहावं, सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये. ५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा होऊनही जे स्वातंत्र्यवीर डगमगले नाहीत त्यांचा त्याग आणि तेज ईडीच्या एका नोटीसने रडकुंडीला आलेल्यांच्या कल्पनेपलीकडचे आहे,” असा सणसणीत टोला अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

हे ही वाचा:

शिकागोमधील नाईट क्लबमध्ये गोळीबारात दोन जणांचा मृत्यू

राहुल गांधींची ईडी चौकशी सुरू; काँग्रेस कार्यकर्त्यांचे आकांडतांडव

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात स्फोट; एकाला घेतलं ताब्यात

लष्कर-ए-तोयबाच्या आदिल पर्रेसह २४ तासांत पाच दहशतवादी ठार

काही दिवसांपूर्वी ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स पाठवले होते. मात्र, त्यावेळी राहुल गांधी हे परदेशी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागितली होती. त्यांनतर ईडीने राहुल गांधींना दुसरे समन्स पाठवून, १३ जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज राहुल गांधी हे चौकशीसाठी हजर झाले. मात्र, पोलिसांची परवानगी नसतानाही, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या जमावाने जमून दिल्ली आणि मुंबईत आंदोलन करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version