‘भारतातल्या बनावट आंदोलकांना समर्थन देणारे, मिठ्या मारणारे, लिबरल्स गारठलेत’

‘भारतातल्या बनावट आंदोलकांना समर्थन देणारे, मिठ्या मारणारे, लिबरल्स गारठलेत’

कॅनडामध्ये कोरोना निर्बंधांविरोधात ट्रक चालकांनी राजधानीच्या रस्त्यांवर उतरत सर्व मार्ग बंद केले आहेत. त्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. कॅनडाच्या या निर्णयानंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, जैसी करनी, वैसी भरनी. दिल्लीच्या किसान आंदोलनाच्या धर्तीवर कॅनडाच्या राजधानीला हजारो ट्रक चालकांनी घेराव घातला आहे. याविरुद्ध कारवाई करताना कॅनडाच्या पंतप्रधानांनी आणीबाणी लागू केली आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले. भारतातल्या बनावट आंदोलकांना समर्थन देणारे, मिठ्या मारणारे सगळे विरोधक, लिबरल्स गारठलेत, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

कॅनडामध्ये कोरोना निर्बंधांविरोधात ट्रक चालकांनी राजधानीच्या रस्त्यांवर उतरत सर्व मार्ग बंद केले आहेत. कॅनाडाच्या इतिहासात पहिल्यांदाच आणीबाणीची घोषणा झाली आहे. आणीबाणीमुळे सरकारला आंदोलकांवर निर्बंध आणण्यास जास्त अधिकार मिळतील याच पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी पंतप्रधान ट्रुडो यांनी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधानांनी ट्रक चालकांच्या आंदोलनाला ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हटले आहे.

हे ही वाचा:

कोविड जम्बो सेंटर घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांनी केली ८९ पानांची तक्रार

दाऊदची बहीण हसिना पारकरच्या मालमत्तेवर ईडीची धाड

हे आहेत इस्रोचे अंतराळातील ‘त्रिमूर्ती’

साईनगर शिर्डी दहशतवाद्यांच्या रडारवर

कॅनडामध्ये ट्रक चालक हे लसीकरणबाबतीतले आदेश आणि वेगवेगळ्या प्रतिबंधांना विरोध करत आहेत. कॅनाडा सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की, अमेरिकेला जाणाऱ्या ट्रक चालकांना कोरोनाची लस घेणे बंधनकारक असेल. मात्र ही अट हटविण्याची मागणी ट्रकचालक करत आहेत.

Exit mobile version