भातखळकरांची टीका; राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा खेळ

महाराष्ट्र कर्नाटक वादावर घणाघात

भातखळकरांची टीका; राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा खेळ

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानसभेत महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादवरून जोरदार टीका करत या प्रश्नाबाबत मुद्दे मांडले. कर्नाटक केंद्रशासित जाहीर करा अशीही मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीचा समाचार भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी घेतला आहे. स्वतःच्या पक्षीय राजकारणाकरीता आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सीमाभागातील्या मराठी माणसांच्या भावनाशी खेळू नका असा जोरदार टोला भाजप आमदार भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना आमदार भातखळकर म्हणाले, सीमावादावर उद्धव ठाकरे आज बोलले. पण उद्धव ठाकरे यांची झोप आज उडाली का? अडीच वर्षे ते मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना या प्रश्नाची आठवण नाही झाली.? मुख्यमंत्री असताना ते मंत्रालयातही सुद्धा येत नव्हते आणि या प्रश्नावरही ते कधी बोलले नाहीत. माझी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की स्वतःचे पक्षीय राजकारणाकरीता आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सीमाभागातल्या मराठी माणसांच्या भावनाशी खेळू नका असा सल्ला त्यांनी तिला आहे.

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना भातखळकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि या सरकारची भूमिका स्पष्ट आहे. निपाणी आणि बेळगाव सह सर्व भाग महाराष्ट्रात आला पाहिजे याची केस आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढतो आहे. विधानसभेमध्ये आज किंवा उद्या आम्ही हा ठराव एकमताने पारित करू. सीमा भागातल्या मराठी माणसाच्या मागे सरकार आणि भारतीय जनता पार्टी अत्यंत खंबीरपणे उभी आहे आणि त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे खडे बोलही भातखळकर यांनी विरोधकांना सुनावले आहेत.

हे ही वाचा:

तुनिशा मृत्यु प्रकरणी लव्ह जिहादच्या अनुषंगाने तपास

आदित्य, राष्ट्रवादीचा शेवाळे प्रकरणाशी काय संबंध?

पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला…

सीमावर्ती बांधवाना वाऱ्यावर सोडणार नाही.. इंच इंच लढू

 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने देशात भाषिक राज्य देणार अशी घोषणा केली होती. मग तेलगू भाषेला आंध्र मिळालं कर्नाटकाला त्यांच्या कानडी भाषेतील राज्य मिळालं. राज्य कोणाला मिळाला नाही तर फक्त मराठी माणसाला . महाराष्ट्र स्वतंत्र ठेवला आणि मुंबई दिली नाही, याकडे भातखळकर यांनी लक्ष वेधलं.

मराठी माणसाबद्दल आकस होता- आहे

१९५६ साली भाषिकांचा कायदा देशाच्या लोकसभेमध्ये जाहीर केला की मुंबई स्वतंत्र राहील. आणि ही मागणी पंडित नेहरू यांची तर होतीच, पण तत्कालीन मुबंई काँग्रेस अध्यक्ष स. का. पाटील यांचीही होती. त्यावेळच्या काँग्रेसची होती. यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते महाराष्ट्रापेक्षा पंडित नेहरू मोठे आहेत असे महाराष्ट्राच्या प्रश्नाबाबत मी त्यांचे ऐकेन. त्यामुळे पंडित नेहरू आणि दिल्लीच्या नेतृत्वामध्ये मराठी माणसाबद्दल आकस होता आणि आहे. त्यामुळे फक्त मराठी माणसाला त्यावेळी मराठी भाषिक राज्य दिले नाही असा स्पष्ट आरोप भातखळकर यांनी केला

Exit mobile version