उत्तर भारतीय जनतेच्या द्वेषावर काँग्रेस फोफावली; आदित्यनाथांच्या भेटीवरून राजकारण

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केला घणाघात

उत्तर भारतीय जनतेच्या द्वेषावर काँग्रेस फोफावली; आदित्यनाथांच्या भेटीवरून राजकारण

ही काँग्रेसची जुनी प्रथा आहे. संपूर्ण देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसने धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली आणि स्वातंत्र्यानंतर मुस्लिमांचे तुष्टीकरण केले. इतकेच नाही तर महाराष्ट्र काँग्रेसची जनता नेहमीच उत्तर भारतीय आणि बिहारी आणि राज्यातील सर्व जनतेच्या द्वेषाच्या आधारावर फोफावली आहे असा घणाघात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या वक्तव्यावर त्यांनी ही टीका केली.

माजी खासदार हुसेन दलवाई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पारंपारिक भगव्या पोशाखाची खिल्ली उडवली. यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. धर्माच्या गोष्टी करण्याऐवजी आणि भगवे कपडे घालून फिरण्याऐवजी जरा मॉडर्न व्हा आधुनिक व्हा. उद्योग हे आधुनिकतेचे असतात आधुनिक विचार घ्या तर उद्योग येतील अशी सल्ला वजा टीका दलवाई यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांकडून जोरदार टीका केली आहे.

धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करण्याची काँग्रेसची ही जुनी प्रथा आहे. धर्माच्या आधारावरच काँग्रेसने संपूर्ण देशाची फाळणी केली . स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने नेहमीच खोट्या धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करून मुस्लिमांचे तुष्टीकरण केले. उत्तर भारतीय आणि अन्य राज्यातल्या लोकांच्या द्वेषावर काँगेसने आपली भरभराट केली. म्हणूनच ते उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आहेत, असे भातखळकर यांनी एका वाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड आपली सर्वस्वी श्रद्धा औरंगजेबावर आहे!

सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार

सिंधुताई सपकाळ अनाथांची माय

रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”

योगी आदित्यनाथ कोविड काळात मुंबईला आले होते त्यावेळी शिवसेनेच्या सामना मुखपत्रामध्ये आदित्यनाथ यांचा उल्लेख पाकीट चोरणारा माणूस म्हणून उल्लेख केला होता. पण मुंबई ही मुंबई आहे. मुंबई मराठी आणि अन्य राज्यातील लोकांचा त्याग आणि मेहनतीमुळेच घडली आहे, असे भातखळकर यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version