26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणनवाब मलिक म्हणजे गटारगंगा आणि NCP म्हणजे नशेडी चरसी पार्टी

नवाब मलिक म्हणजे गटारगंगा आणि NCP म्हणजे नशेडी चरसी पार्टी

Google News Follow

Related

आमदार अतुल भातखळकर यांचा हल्लाबोल

शाहरुख खान पुत्र आर्यन खान याला अटक केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नबाव मलिक हे रोज नवनवे आरोप करत आहेत. त्यांच्या या आरोपांवर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी हल्लाबोल केला आहे.

आमदार भातखळकर म्हणतात की, आधी तर नवाब मलिक यांनी घोषणा केली होती ना, ललित हॉटेलच्या रोमहर्षक कथांबाबत. पण आता मोहित भारतीयांवर ते आरोप करायला लागले. नवाब मलिक ही गटारगंगा आहे. त्यांना सुप्त आशीर्वाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे आहेत. मलिक यांचा जावई आठ महिने तुरुंगात होता तेच आता ड्रग्सविरोधात बोलत आहे. मोहित कंबोज भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही पदावर नाहीत. पण कुठला तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो दाखवला आणि भाजपाचे ड्रग्स कनेक्शन आहे असे ते सांगत सुटले. याच न्यायाने मग तुमचा तर सख्खा जावईच ड्रग्स प्रकरणात आत होता. मग आम्ही एनसीपीचे वर्णन नशेडी चरसी पार्टी असे करू का?

भातखळकर यांनी असाही सवाल उपस्थित केला की, तुम्ही न्यायालयात का जात नाही? साईल एनसीबीसमोर का आला नाही? अपयश, खंडणीखोर राज्य, भ्रष्टाचार यापासून लोकांचे लक्ष विचलित व्हावे म्हणून मलिकांचे हे सगळे चालले आहे.

 

हे ही वाचा:

भारत पाक युद्धातील माजी सैनिकाचा नांदेडमध्ये खून

अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाचे छापे

PM मोदी पुन्हा अव्वल

 

अहमदनगरचे आपण पाहिले की, चार महिने स्प्रिन्कलिंग वॉटरचा प्रस्ताव आयुक्तांकडे पडून होता. त्यामुळे हे लक्ष विचलित करण्यासाठी नवाब मलिकांची आणि महाभकास आघाडीची नाटकं आहेत. बाकी कशाला अर्थ नाही. त्यांनी रिट पिटिशन दाखल करावी, न्यायालयात जावं. पण ते हास्यास्पद आरोप करत आहेत. खोटारडेपणा, बेशरमपणाचा हा कळस आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा