काँग्रेसचे म्हणजे जिंकता येईना ईव्हीएम वाकडे

आमदार अतुल भातखळकर यांचा नाना पटोले यांना सणसणीत टोला

काँग्रेसचे म्हणजे जिंकता येईना ईव्हीएम वाकडे

हरियाणा निवडणुकीतील पराभवानंतर या अपयशाचे खापर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ईव्हीएमवर फोडले आहे. मतमोजणी केंद्रावर अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. हरियाणाचा विजय हा भाजपाने प्रशासनाच्या मदतीने मिळवला असल्याने हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेस आणि नाना पटोले यांना सुनावले आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “जिंकता येईना ईव्हीएम वाकडे. रडारड सुरू हरियाणाचा पराभव नाना पटोलेंच्या भलताच जिव्हारी लागलेला दिसतोय. नाना लवकर बरे व्हा याचं शुभेच्छा.” असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

हे ही वाचा..

अनंतनागमधून अपहरण झालेल्या जवानाचा मृतदेह सापडला

घटना घडून पाच दिवस झाल्यानंतर बोपदेव घाट परिसर पाहणीचा देखावा कशासाठी?

स्त्री शक्तीचा जागर: झाशीची राणी लक्ष्मीबाई

ऑल्ट न्यूजचे मोहम्मद झुबेरविरोधात तक्रार दाखल

हरियाणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेससाठी अनुकूल आणि भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्ष आघाडीवर असताना अचानक उलटे चक्र कसे फिरले? मतमोजणी केंद्रावर अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, असे नाना पटोले म्हणाले. तसेच काही जिल्ह्यातील ईव्हीएम मशिनची बॅटरी ९९ टक्के चार्ज होती आणि त्याच ठिकाणी काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला आणि भाजपाचे उमेदवार निवडून आले. ज्या ईव्हीएमच्या बॅटरी ६०-७० टक्के चार्ज होत्या त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. ईव्हीएमशी छेडछाड केल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत असे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी खपवून घेणार नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

Exit mobile version