अतुल भातखळकरांनी मविआतल्या पक्षांची पिसे काढली

अतुल भातखळकरांनी मविआतल्या पक्षांची पिसे काढली

भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीच्या दृष्कृत्यांचा पाढाच विधानसभेत वाचून दाखविला. अक्षरशः त्यांनी त्या सरकारची पिसे काढली. निलंबित केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेत आहात असा सवाल विचारल्यावर आमदार भातखळकर यांनी सचिन वाझेचे प्रकरण सांगत विरोधकांचे तोंड बंद केले.

ते म्हणाले,  दलालांचं राज्य होतं अडीच वर्षे. पण आता हेच दीड महिन्याच्या सरकारवर आरोप करत आहात. निलंबित पोलिस अधिकाऱ्यांना चौकशीशिवाय परत घेणे योग्य नाही, असा सवाल विचारला जातोय. तुम्ही सचिन वाझेला विसरलात का. निलंबित असताना तो शिवसेनेचा प्रवक्ता होता म्हणून. की कमिटमेंट केल्या होत्या म्हणून सेवेत घेतले का? घेतले तर घेतले तर तात्काळ क्राइम बँचचे महत्त्वाचे युनिट. त्यात महत्त्वाचे युनिय सीआययू.

वाझेवर आरोप झाले याच सदनात. तेव्हा काय सांगितले तर सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का. मला तर कळले की तो डायरेक्ट वर्षावर जाऊन ब्रिफिंग करायचे. सीआयडीचे ब्रिफिंग नव्हते पण साध्या पीआयचं ब्रिफिंग घेतलं जात होतं. ज्याने अँटिलियासमोर स्फोटकं ठेवली. त्याच्याकडून ब्रिफिंग? आणि हेच आज प्रश्न विचारत आहेत की निलंबित अधिकाऱ्यांना तुम्ही कामावर घेत आहात. आपलं कर्तृत्व काय, इतिहास काय, की विस्मरणाचा रोग लागला आहे की काय? असा खरमरीत सवाल आमदार भातखळकर यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

‘अफजल खान वधा’ला विरोध सहन केला जाणार नाही

एरंगल गावातील बेकायदा स्टुडिओ प्रकरणाची होणार सखोल चौकशी

लवासाचा १८५९ मध्यमवर्गीयांना गंडा…पवारसाहेब देशमुख, मलिक, राऊत सोडा सुप्रियाताईंची चिंता करा…

दहीहंडी आयोजकांची मस्ती गोविंदा संदेश दळवीला नडली….

 

आमदार भातखळकर म्हणाले की, पण एक सांगतो की विसरण्याचा प्रयत्न केला तरी एकनाथ शिंदे व फडणवीस पापं विसरू देणार नाहीत. या तुमच्या महाभकास आघाडीचा अंतिम आठवडा प्रस्ताव.  एका महिन्यात तुम्हाला सगळं आठवलं. आमदारांना मंत्रिपद देण्याचे आमिष देऊन गैरव्यवहार केल्याची बाब उघडकीस आली पण आली नाही आणली. ज्यांना कुणी फोन केले त्या सदस्यांनी फडणवीसांची भेट घेतली व पोलिसांना सांगून अटक केली. तुमच्या काळात काय परिस्थिती होती. तक्रार केली तर डीसीपी सौरभ त्रिपाठी फरार. त्याची कथा काय होती. पोलिस इन्स्पेक्टरने दम दिला. ते बिचारे गेले डीसीपीकडे सीनियरची तक्रार घेऊन डीसीपी बोलला माझे काय? तेव्हा दिलीप वळसे होते म्हणून ठीक. त्यामुळे त्यांना फरार व्हावे लागले. याआधीचे गृहमंत्री असते तर ‘मेरा क्या’ असेच म्हणाले असते.

Exit mobile version