‘ठाकरे सरकारचा राज्यकारभाराचा पोरखेळ’

‘ठाकरे सरकारचा राज्यकारभाराचा पोरखेळ’

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली असून नितेश राणे सध्या कुठे आहेत याबद्दल माहिती घेण्यासाठी नारायण राणे यांना बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यकारभाराचा पोरखेळ चालवला असल्याचा घाणाघात अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

राज्य सरकारने राज्यकारभाराचा सगळा पोरखेळ चालवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यपालांना अश्लाघ्य भाषेत पत्र लिहायचे, त्यांना दम द्यायचा आणि त्यानंतर एका शुल्लक गोष्टीवरून केंद्रीय मंत्र्याला नोटीस पाठवायची.

हे ही वाचा:

बांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण ‘वाढविण्याची’ सोय?

राजेश टोपेंना मिळणार ‘घोटाळेरत्न’ पुरस्कार

रणझुंजार नव्हे तर घरझुंजार! अतुल भातखळकर यांची टोलेबाजी

‘मुख्यमंत्र्यांचे पत्र धमकीवजा’

पोलिसांनी आणि राजकीय नेतृत्त्वाने नितेश राणे कुठे आहेत हा प्रश्न विचारण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री कुठे आहेत हे विचारायला हवे. अजित पवारांना या संबंधी विचारायला हवे. अधिवेशनाच्या आधी झालेल्या चहापान कार्यक्रमात अजित पवारांनी थाप मारली होती. मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम असून ते अधिवेशनाला हजर राहतील हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री अधिवेशनाला हजर राहतील असे सांगितले होते. मात्र, पाच दिवसांच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकदाही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे राज्यकारभाराचा हा पोरखेळ मांडून ठेवला आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

नोटीस पाठवणे म्हणजे ही केवळ राजकीय सूडबुद्धी आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले. आपले राजकीय प्रतिस्पर्धी पोलीस बळाचा वापर करून संपवून टाकण्याचा राज्यसरकार प्रयत्न करत आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले. सरकारकडून पोलीस यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणात म्हटले आहे. उच्च न्यायालयाने कंगना रानौत हिच्या प्रकरणात म्हटले आहे, असे अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेला काळिमा फासण्याचे काम हे सरकार करत असून त्याचानिषेध करत असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version