पटोलेंना अटक करायची सोडून आम्हाला कसली अटक करता!

पटोलेंना अटक करायची सोडून आम्हाला कसली अटक करता!

अतुल भातखळकर यांना घेतले ताब्यात

मोदींना आपण मारून टाकू शकतो, शिव्याही देऊ शकतो, असे आक्षेपार्ह विधान करणारे काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध आता महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून विविध ठिकाणी भाजपाच्या आंदोलनांची धार तीव्र होऊ लागली आहे. मुंबईत कांदिवली येथे भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली पटोलेंविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा भातखळकर यांनी पटोले आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी अटक केल्यावर ते म्हणाले की, नाना पटोलेंना आधी अटक करा. आम्हाला कशाला? महाभकास आघाडीचे पोलिस आम्हाला अटक करत आहेत. आम्ही पटोलेंचे पुतळे जाळले, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले. पण याबाबत पोलिस आम्हालाच अटक करत आहेत. पटोलेंविरोधात कारवाई करा. आमदार भातखळकर यांना अटक करून नेत असताना आंदोलनकर्त्यांनी पोलिसांची गाडी अडविली. गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपा कार्यकर्त्यांनी घेतला.

पटोलेंविरोधात एकूणच राज्यभरात आता भाजपाने आंदोलने सुरू केली आहेत. मुंबई, कल्याण, नागपूर याठिकाणी आंदोलने केली जात आहेत. पटोले यांचे पोस्टर्स फाडले जात आहेत. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले जात आहेत. मुंबईत बोरिवलीतही आंदोलन करण्यात आले. तिथे पटोले हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. बोरिवलीत हे जोडेमारो आंदोलन करण्यात आले. कल्याणमध्येही आंदोलन झाले. तिथेही भाजपा कार्यकर्त्यांनी पटोलेंच्या प्रतिमेला जोड्यांनी हाणले.

नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंविरोधात आंदोलन केले आणि पोलिसात तक्रार केली आहे. पटोले यांचा निषेध केला गेला.  पण तिथेही पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आपण पटोलेंविरोधात कोर्टात जाऊ असेही बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील निवडणूक प्रचारादरम्यान काही लोकांशी संवाद साधताना आपण मोदींना मारू शकतो, शिव्याही घालू शकतो, असे आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून आता भाजपा आक्रमक झाली आहे. नारायण राणेंनी वक्तव्य केले म्हणून त्यांना अटक केली जाते मग पटोलेंनाही अटक करा. त्यांची आमदारकी काढून घ्या, अशा मागण्या केल्या जाऊ लागल्या आहेत.

हे ही वाचा:

‘पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय’; अटक करण्याची नितीन गडकरींची मागणी

‘नानाभाऊ शारीरिक उंची असून चालत नाही, बौद्धिक उंची पण हवी’

किरण माने प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री

‘भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ’

 

पटोलेंनी मात्र यावर प्रतिक्रिया देताना मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल आपण बोलत होतो असे म्हटले. आपण नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलत नव्हतो. लोक या गावगुंडाबद्दल तक्रारी करत असल्यामुळे आपण त्यांना आश्वस्त करत होतो, असे पटोले म्हणाले होते.

 

Exit mobile version