शर्जील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई

शर्जील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई

एल्गार परिषदेत भाषण करताना हिंदू विरोधी विष ओकणारा शर्जील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे असा टोला भरतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंट वरून ट्विट करत भातखळकर यांनी उस्मानीच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे.

हिंदूविरोधी गरळ ओकणारा जिहादी विचारांचा तरुण शर्जील उस्मानी याचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला आहे. बुधवारी शर्जील उस्मानी पुणेतील स्वारगेट पोलीस ठाण्यात हजार झाला. ३० जानेवारी रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत उस्मानी वक्ता म्हणून हजर होता. यावेळी आपल्या भाषणात ‘हिंदू समाज सडलेला आहे’ असे आक्षेपार्ह वक्तव्य उस्मानी कडून करण्यात आले होते.

हे ही वाचा:

कोणीही येऊन हिंदूंना शिव्या घालाव्यात हीच ठाकरे सरकारची इच्छा

बंगालचा प्रवास: लाल सलाम ते जय श्रीराम

मंगळवारी महाराष्ट्र सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात असे आश्वस्त करण्यात आले की न्यायालयाच्या पुढच्या सुनावणी पर्यंत उस्मानी याच्या विरोधात अटकेची किंवा इतर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. या नंतर उच्च न्यायालयातर्फे शर्जील उस्मानीला बुधवारी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर होण्याचा आदेश देण्यात आला. न्यायालयाच्या या आदेशाचे पालन करताना उस्मानी पुणे पोलिसांसमोर हजर झाला. पण उस्मानीच्या येण्याबाबत सरकारकडून खूपच गोपनीयता बाळगली गेली. यावरूनच आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे दाढी कुरवाळणारे सरकार
ठाकरे सरकार हे दाढी कुरवाळणारे सरकार सरकार आहे असे भातखळकरांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. उस्मानी त्याचा जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात येऊन गेला पण या कानाचे त्या कानाला कळले नाही असे देखील भातखळकर म्हणाले.

Exit mobile version