दुबळ्या राज्यकर्त्यांमुळे दंगेखोरांचे मनोधैर्य वाढले

दुबळ्या राज्यकर्त्यांमुळे दंगेखोरांचे मनोधैर्य वाढले

राज्याचे राज्यकर्ते हे दुबळे आणि अपयशी असल्यामुळे दंगेखोरांचे मनोधैर्य वाढले आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखाळकर यांनी केला आहे. अमरावतीमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना भातखळकर यांनी हे मत व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे सरकार हे अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करणारे सरकार आहे असेही भातखळकर म्हणाले आहेत.

त्रिपुरा मध्ये एका मशिदीशी संबंधित झालेल्या कथित हिंसाचाराच्या प्रकरणावरून महाराष्ट्र पेटताना दिसत आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विविध भागात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलेला दिसला. अमरावती, नांदेड, मालेगाव अशा राज्याच्या विविध भागात हा जमाव रस्त्यावर उतरला. पण या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. शहर बंदची हाक दिलेली असतानाही शहरातील विविध भागात दुकाने सुरु होती. त्यामुळे ह्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली. तर या जमावाला काबूमध्ये ठेवण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली.

हे ही वाचा:

अनिल परब शरद पवारांच्या भेटीला

आता एसटी कर्मचारी ठोठावणार अनिल परब यांचे दार

‘रझा अकादमीवर बंदी घाला’

सलमान खुर्शीद यांना, हिंदुत्वावर बरळल्यानंतर घरचा आहेर

पण या घटनेला अनेक तास उलटून गेले तरीही हे वातावरण शांत होताना दिसत नाहीये. शनिवार, १३ नोव्हेंबर रोजी अमरावतीत बंदचे आव्हान करण्यात आले होते. या बंद मध्ये आंदोलक आक्रमक झालेले दिसत आहेत. या बाबत आता महाराष्ट्र्रात राजकारणही तापताना दिसत आहे. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना भाजपावर आरोप केला असून रझा अकादमी हे भाजपाचे पिल्लू असल्याचे म्हटले आहे.

तर भाजपाचे मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी या हिंसाचारावरून ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यात दुबळे आणि अपयशी सरकार असल्यामुळे दंगेखोरांची हिम्मत वाढली आहे असे भातखळकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांप्रमाणे हे सरकारही अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करत आहे. काल मुस्लिम समाजाने हिंसाचार केला, पण गृहराज्यमंत्री यांनी त्यांच्या निवेदनामध्ये हिंदू समाजानेही शांत रहावे असे ते म्हणाले. मुळात हिंदू समाज हिंसक झालाच नाही तर निवेदनात त्याचा उल्लेख का? असा सवालही भातखळकर यांनी केला आहे.

Exit mobile version