मंगळवार, २२ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीकडून कारवाई झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या कारवाईनंतर ठाकरे सरकारमधील नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझं मत विचाराल तर माझ्या मुलीला मी महाराष्ट्रात ठेवणार नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “ईडी ने आपल्या मुलीला नोटीस बजावली तर मी आत्महत्या करणार असे हास्यास्पद वक्तव्य मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केले आहे. ईडीला अनंत करमुसेंसारखं बंगल्यावर नेईन आणि हाडं मोडून टाकेन असे बाणेदार उत्तर अपेक्षित असताना आव्हाडांनी असला भेकडपणा दाखवणे निराशाजनक आहे,” असा टोला अतुल भातखळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.
ED ने आपल्या मुलीला नोटीस बजावली तर मी आत्महत्या करणार असे हास्यास्पद वक्तव्य मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केले आहे.
ED ला अनंत करमुसेंसारखं बंगल्यावर नेईन आणि हाडं मोडून टाकेन असे बाणेदार उत्तर अपेक्षित असताना आव्हाडांनी असला भेकडपणा दाखवणे निराशाजनक आहे. pic.twitter.com/DtBfQ5sz2y— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 23, 2022
“राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, यावर आता वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. पण माझं मत विचाराल तर माझ्या मुलीला मी महाराष्ट्रात ठेवणार नाही. राज्याने कुणावर कधी अशी सूडबुद्धीन कारवाई केली नाही, कुणाला जेलमध्ये टाकलंय असं झालं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.
हे ही वाचा:
‘उ. प्रदेशमधील पराभवासाठी प्रियांका गांधींचा राजीनामा घ्या’
तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर प. बंगालमध्ये १० जणांना जिवंत जाळलं
‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’
‘राष्ट्रीय महामार्गांवर ६० किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असेल’
मंगळवार, २२ मार्च रोजी सकाळपासून ठाण्यात ईडीने हे धाडसत्र सुरू केले होते.त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे महुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ६.४५ कोटींची ही मालमत्ता असून त्यावर ईडीने टाच आणली आहे. ११ फ्लॅटच्या स्वरूपात ही संपत्ती जप्त केली आहे.