‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’

‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’

आमदार अतुल भातखळकर यांचे टीकास्त्र

सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याच्या महापापाची पुनरावृत्ती करण्याचे काम महाभकास आघाडी सरकारने केले असून २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षार्थींना एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्याचा ‘महा-पराक्रम’ करण्यात आला आहे, या परीक्षार्थींनी ही परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे, त्यामुळे टोपे साहेब या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी आता हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था कराच, अशी टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अर्थपूर्ण संवाद करत बोगस कंपनीला कामे द्यायची आणि त्यातून गोंधळ निर्माण करायचा हाच महाविकास आघाडी सरकारचा ‘भ्रष्टाचारी पॅटर्न’ बनला असल्याचे वारंवार समोर येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ अद्यापही मिटलेला नाही. एकदा ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यानं राज्यातील लाखो परीक्षार्थींनी आक्रोश केला. मात्र, आता दुसऱ्यांदा परीक्षा घेताना देखील या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागत असल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा:

‘पवार कुटुंब जनतेला लुटत आहे’

ठाण्यात ‘ढाण्या वाघा’चे पोस्टर्स; शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा

उद्धव ठाकरे बकरा, शरद पवार कसाई! सदाभाऊंचा सणसणीत टोला

अनिल देशमुखांना विसरा, परमबीरना शोधा!

 

अनेक परीक्षार्थींना अर्ज करताना जे केंद्र मागितलं ते मिळालंच नाही. तर याहीवेळी अनेक परिक्षार्थीचे प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ सुद्धा नाही त्यामुळे नक्की परीक्षा कशी द्यायची, असे प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा निर्माण झाले आहेत.

Atul Bhatkhalkar

टोपेंची हकालपट्टी करा!

त्यामुळे आता या विषयांत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात याव्या व आपल्या निष्क्रियतेमुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वेठीस धरण्याचे काम करणाऱ्या व केवळ खोट्या वल्गना करण्यात धन्यता मानणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची तात्काळ मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी आग्रही मागणी सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Exit mobile version