‘ठाकरे सरकारचा कारभार, महाराष्ट्र बेजार’

‘ठाकरे सरकारचा कारभार, महाराष्ट्र बेजार’

महाविकास आघाडी सरकारला म्हणजेच ठाकरे सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन वर्षांच्या सरकारच्या भूमिकेबद्दल भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधत ट्विट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारचा कारभार, महाराष्ट्र बेजार असे अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘बेस्ट मुख्यमंत्र्यांची दोन वर्षे… वसूली, स्थगिती, यु- टर्न, दोन वर्षे घरी, पण SUV ने पंढरपूरवारी, ‘अंडी उबवली’ (त्यांच्या माहितीनुसार) कोमट पाण्याचे प्रयोग, मोदींच्या नावाने रडारड, तोंडाच्या वाफा… ठाकरे सरकारचा कारभार, महाराष्ट्र बेजार…’ असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

हे ही वाचा:

कल्याणमध्ये विनापरवाना बालगृहात कोंडलेल्या मुलांची सुटका

‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’

नागपूरमधून ८४ लाखांची रोकड जप्त

जॅकलिनचा ‘तो’ रोमँटिक फोटो ठरणार का ED साठी पुरावा?

देवेंद्र फडणवीसांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करावे असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. त्यावरून आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला धारेवर धरत विरोधी पक्ष नेत्यांनी आवाहन करण्याची वेळ महाविकास आघाडी सरकारवर यावी हेच त्यांच्या दोन वर्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन असल्याचे अतुल भातखळकर यांनी महटले आहे. गेली दीड वर्षे मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात पाऊल ठेवलेले नाही. सरकार खंबीर असो नसो पण, राज्याची स्थिती मात्र गंभीर आहे, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

Exit mobile version