‘रझा अकादमीला पोसणे बंद करा, महाराष्ट्र शांत होईल’

‘रझा अकादमीला पोसणे बंद करा, महाराष्ट्र शांत होईल’

शरद पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यांतील वडसा येथे भव्य शेतकरी शेतमजूर कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात बोलताना त्रिपुरातील घटनेचे अमरावतीमध्ये पडसाद का उमटले? असा सवाल करतानाच भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, असे वक्तव्य केले. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आयुष्यभर जाती जातीत तेढ निर्माण करून विखाराचे तेल ओतणारे भाजपवर आरोप करत आहेत अशी टीका केली आहे.

‘आयुष्यभर जाती जातीत तेढ निर्माण करून विखाराचे तेल ओतणारे आणि त्यावर राजकीय पोळी भाजणारे भाजपावर आरोप करतायत,’ असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. तसेच ‘रझा अकादमीला पोसणे बंद करा, महाराष्ट्र शांत होईल,’ असेही अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये दिसले. या संपूर्ण प्रकरणाला हिंसक वळण मिळाले आणि राजकीय वर्तुळातही या घटनांना वेगळेच वळण मिळाले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. या हिंसेला रझा अकादमी कारणीभूत असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले होते. रझा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली होती. अतुल भातखळकर यांनीही महाराष्ट्र शांत होण्यासाठी रझा अकादमीला पोसणे बंद करा असे म्हटले आहे.

हे ही वाचा:

मनात वाईट विचार असणारे अर्धवट माहिती प्रसिद्ध करतात; क्रांती रेडकर यांचे उत्तर

फडणवीसांच्या दारी राज्याचे कारभारी

महाराष्ट्रात ‘नाचलेल्या’ सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट

गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका; फडणवीसांचे पत्र

काल (१८ नोव्हेंबर) मालेगाव येथील रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापेमारी केली होती. कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्ताऐवज पोलिसांनी जप्त केल्याचेही वृत्त होते.

Exit mobile version