एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपवार अजूनही तोडगा निघत नसताना राज्य सरकारने मात्र कठोर भूमिका घेत कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यावरूनच भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत सरकारला टोला लगावला आहे.
‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार संपात सहभागी झालेल्या २९७ कर्मचाऱ्यांचे महामंडळाकडून निलंबन करण्यात आले, तर २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. या वृत्ताच्या आधारे अतुल भातखळकर यांनी कामगारांचे निलंबन करून प्रश्न सुटत नसेल तर परिवहन मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना निलंबित करायला हवे त्यामुळे कदाचित प्रश्न लवकर सुटेल, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी सरकारला लगावला आहे.
हे ही वाचा:
घरातला गॅस संपला आणि एसटी कर्मचाऱ्याने जीवनही संपविले
घरातला गॅस संपला आणि एसटी कर्मचाऱ्याने जीवनही संपविले
३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल
…आणि महिला वनरक्षकाला वाघाने ओढत नेले जंगलात
‘संपात सहभागी झालेले २९७ कर्मचारी एसटी महामंडळाकडून निलंबित; २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर आधी परिवहन मंत्र्यांना आणि नंतर मुख्यमंत्र्यांना निलंबित करून बघायला काय हरकत आहे. कदाचित पटकन प्रश्न सुटेल’ असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्विट करत लगावला आहे.
संपात सहभागी झालेले २९७ कर्मचारी एसटी महामंडळाकडून निलंबित; २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर आधी परिवहन मंत्र्यांना आणि नंतर मुख्यमंत्र्यांना निलंबित करून बघायला काय हरकत आहे. कदाचित पटकन प्रश्न सुटेल. pic.twitter.com/xwoiMSpQyo— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 20, 2021
गेले काही दिवस महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान ३० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर, जवळपास दोन हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. रोजंदारीवर असलेल्यांना कर्मचाऱ्यांची सेवाही एसटी महामंडळाने समाप्त केली आहे.