‘रावणासारखे १० तोंडानी बोलणारे आणि चालणारे हे सरकार’

‘रावणासारखे १० तोंडानी बोलणारे आणि चालणारे हे सरकार’

राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात काय निर्बंध लागणार, लॉकडाऊन लागणार का यावर नागरिकांमध्ये संभ्रम आहे. सत्ताधाऱ्यांमध्येही याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यावरूनच भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रशासनावर निशाणा साधला आहे. रावणासारखे १० तोंडानी बोलणारे आणि चालणारे हे सरकार असल्याचे चित्र आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल हे म्हणाले लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता आहे. शुक्रवार ७ जानेवारी रोजी म्हणतात लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. महापौर म्हणतात, लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही, हे केवळ मुंबईकरांना घाबरवण्याचे आणि त्यांच्यावर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

आता अमृता फडणवीस- विद्या चव्हाण वाद पेटला

‘काँग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काहीही वाकडे करु शकणार नाहीत’

महिलेच्या केसात थुंकणाऱ्या जावेद हबीबचा माफीनामा

प्लास्टिक द्या आणि चहा, वडापाव घ्या!

उपनगराचे पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री एक बोलतात, शहराचे पालकमंत्री अजून तिसरेच विधान करतात. रावणासारखे १० तोंडानी बोलणारे आणि चालणारे हे सरकार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एक धोरण ठेऊन एक मताने बोला, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. आतापेक्षा अधिक कठोर निर्बंध लावल्यास मुंबईकर जनतेला आर्थिक मदत करावीच लागेल, हे आयुक्तांनी, पालकमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे आणि मग निर्णय घ्यावेत, असे अतुल भातखळकर म्हणाले. कुठल्याही मदतीशिवाय निर्बंध घालणे हे जनतेला परवडणारे नाही आणि सहनही होणार नाही, असेही अतुल भातखळकर म्हणाले.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून राज्यात किंवा शहरात लॉकडाऊन लावायचा की नाही, निर्बंधांविषयीही अधिकाऱ्यांकडून आणि मंत्र्यांकडून वेगवेगळी विधाने केली जात आहेत. त्यामुळे सामान्य जनतेसमोर संभ्रम निर्माण होत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत लॉकडाऊनची शक्यता नाही मात्र, मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. त्यापूर्वी आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईत २० हजार पेक्षा अधिक रुग्ण मुंबईत झाल्यास लॉकडाऊन लागणार असे सांगितले होते. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रति दिवशी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागल्यास लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

Exit mobile version