देशभरात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्र रुग्णवाढीमध्ये अव्वल स्थानावर आहे. मात्र देशात दररोज एक लाख लस देणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नावच नाही.
गेल्या चोविस तासात महाराष्ट्रात आजवरची सर्वात मोठी रुग्णवाढ पहायला मिळाली होती. सुमारे ३०,००० नवे रुग्ण आढळले होते. मात्र तरीही ठाकरे सरकार लसीकरणासाठी आवश्यक तेवढ्या लसी उपलब्ध नसल्याचे तुणतुणे वाजवत आहे. त्यातच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार देशातील सहा राज्यांनी दररोज एक लाख लस देण्याचे लक्ष्य नक्की केले आहे. परंतु महाराष्ट्राचे यात नावच नाही. त्यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.
हे ही वाचा:
पवारांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश
अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करा
राज्याने दरोडे घातले तर तपास केंद्र सरकारलाच करावा लागेल
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करताना म्हटले आहे, ‘देशातील सहा राज्यांनी रोज लाख लसी देण्याचे टार्गेट ठेवले आहे. कोरोना संसर्गात देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राचे या अहवालात नावच नाही. घरबशा मुख्यमंत्री हलत नाही, डुलत नाही. राज्यात सुरू असलेल्या खंडणीखोरीच्या राजकारणातून वेळ मिळाला तर ही कामे होतील ना…’
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी खंडणीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यावरून ठाकरे सरकारवर चौफेर टिका केली जात आहे. त्याचाच आधार घेऊन भातखळकरांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.