Budget 2022: ‘विकासचक्राला गती देणारा हा अर्थसंकल्प’

Budget 2022: ‘विकासचक्राला गती देणारा हा अर्थसंकल्प’

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. सलग दुसऱ्या वर्षी अर्थमंत्र्यांनी पेपरविना अर्थसंकल्प मांडताना सर्वच क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावरून आता नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा विकासचक्राला गती देणारा असल्याचे म्हटले आहे.

लोकप्रिय घोषणांच्या मोहात न पडता खऱ्या अर्थाने अर्थकारणाला चालना देणारा धाडसी अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे, असे मत अतुल भातखळकर यांनी व्यक्त केले आहे. उत्पादन, निर्यातीला चालना देणारा, शेतीला बळ देणारा आणि विकासचक्राला गती देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे अतुल भातखळकर म्हणाले.

हे ही वाचा:

Budget 2022: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २०० चॅनेल्सची घोषणा

Budget 2022 : काय स्वस्त काय महाग?

Budget 2022: अर्थसंकल्पाला ‘बाजारातून’ सकारात्मक प्रतिसाद

Budget2022 : RBI द्वारा ‘डिजिटल रुपया’ सादर होणार

अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी सांगितलं की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये पुढील २५ वर्षांची ब्ल्यू प्रिंट असेल. देशाच्या आर्थिक परिस्थितीला आणखी बळकट करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्याप्रमाणे रेल्वे, विद्यार्थी, ५जी सेवा, रोजगार आदी क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत.

Exit mobile version