एरंगल गावातील बेकायदा स्टुडिओ प्रकरणाची होणार सखोल चौकशी

आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नांना यश

एरंगल गावातील बेकायदा स्टुडिओ प्रकरणाची होणार सखोल चौकशी

मढ येथील एरंगल गावात झालेल्या बेकायदा स्टुडिओ प्रकरणी मी उपस्थित केलेल्या मुदद्यांची सखोल चौकशी करण्याची घोषणा मंत्री महोदय दीपक केसरकर यांनी सभागृहात केली, असे ट्विट करून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मंत्री केसरकर यांचे आभार मानले.

आमदार अतुल भातखळकर यांनी या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा विधानसभेत लावून धरला. तत्कालिन पालक मंत्र्यांना याठिकाणी स्टुडिओ उभारण्यात रस होता असा आरोप आमदार भातखळकर यांनी केला होता.

हे ही वाचा:

‘अफजल खान वधा’ला विरोध सहन केला जाणार नाही

मुंबई पोलिसांना परवडतील अशीच घरे देणार

दहीहंडी आयोजकांची मस्ती गोविंदा संदेश दळवीला नडली….

लवासाचा १८५९ मध्यमवर्गीयांना गंडा…पवारसाहेब देशमुख, मलिक, राऊत सोडा सुप्रियाताईंची चिंता करा…

 

कोविडच्या काळात लोकांचे लक्ष नसताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून हे काम जलदगतीने का करण्यात आले, असा प्रश्नही त्यांनी विचारला. सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. उपनगरचे पालकमंत्री व शहर पालकमंत्री त्यांची संयुक्त भेट झाली. या भेटीनंतर एमटीडीसी जागेच्या भरणीला वेग आला. दीड लाख ट्रक भरणी करण्यासाठी परवानगी दिली. त्यात एक अट अशी होती. की एक एकरावर  एक हजार झाडे लावायची. ही भरणी करत असताना त्याठिकाणी झाडे होती ती नष्ट केली गेली. माझ्याकडे पुरावे आहेत, असे भातखळकर म्हणाले.

कांदळवन अधिकाऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्र विचारण्यात आले. तेव्हा विभागीय वनअधिकाऱ्यांनी लिहिले होते. सदर जागेवर बाभूळ, सुबाभूळ, चिंच पळस अशी झाडे दिसून येत आहेत. आज तिथे गेलात तर एकही झाड दिसत नाही, असेही भातखळकर यांनी सांगितले.

Exit mobile version