भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सचिन वाझेच्या अटकेवरून सरकारला धारेवर धरले आहे. “वाझे याच्या अटकेनंतर विषय संपत नाही, त्यानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ज्याची उत्तरे फक्त मुख्यमंत्री देऊ शकतात.” असे म्हणत आमदार अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अनेक कठीण प्रश्न विचारले आहेत.
शनिवारी रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता वाझे हे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पेडर रोड येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ही चौकशी तब्बल तेरा तास चालली. तेरा तासांच्या चौकशी नंतर वाझे याला एनआयए कडून अटक करण्यात आली. या अटकेनंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.
हे ही वाचा:
अर्णबला अटक करताना वाझेंनी वापरली होती ‘तीच’ स्कॉर्पिओ
‘त्या’ इनोव्हा गाडीचे वाझे कनेक्शन
मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा – आमदार अतुल भातखळकर
सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?
काय म्हणाले अतुल भातखळकर
“सचिन वाझे यांना झालेली अटक महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा काळा अध्याय आहे. २०१७ साली वाझे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असताना त्यांना पुन्हा सेवेत का घेतले गेले? सेवेत घेतल्यावर त्यांना क्राईम ब्रँच सारखा महत्वाचा विभाग का दिला? ‘तू आमची राजकीय कामे कर आणि त्याबदल्यात तुला काय हवं ते कर’ असा काही सौदा सचिन वाझे सोबत ठरला होता का याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे.” अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे