वसा लोकसेवेचा…आमदार अतुल भातखळकर यांचा कार्य अहवाल प्रकाशित

वसा लोकसेवेचा…आमदार अतुल भातखळकर यांचा कार्य अहवाल प्रकाशित

भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांचा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला आहे. रविवार १२ डिसेंबर रोजी कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर परिसरात हा सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. तर याच वेळी भाजपाचा मोठा कार्यकर्ता मेळावाही संपन्न झाला आहे.

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या राष्ट्रमाता जिजाऊ महिला आधार भवनाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

हे ही वाचा:

संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल

मुंबई महापालिकेत वाहते भ्रष्टाचाराची गटारगंगा

…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?

‘म्हाडा’ ची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा संताप

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार अतुल भातखळकर हे भाजपाचा एक अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून प्रसिद्ध आहेत. गेली अनेक वर्ष भाजपासाठी पूर्णवेळ कार्यरत असताना विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भातखळकर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तर आमदारकीच्या पहिल्या कारकिर्दीतील त्यांचे कामकाज पाहून पक्षाने आणि जनतेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. २०१९ ला जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले. गेल्या दोन वर्षात त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील अनेक महत्वाच्या प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडली असून विकास कामांचा सपाटा लावला आहे.

या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा जी, खा. गोपाळ शेट्टी, योगेश सागर, भाई गिरकर, राजहंस सिंह आणि इतर नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version