मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळणार

उपमुख्यमंत्र्यांचे आमदार अतुल भातखळकर यांना आश्वासन

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळणार

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपाचे प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांच्या मतदार संघातील समस्यांबाबत आज झालेल्या बैठकीत दिले. घरा ऐवजी २५ ते ४० लाख रुपयांचा पर्यायही प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कांदीवली पूर्व विधानसभा मतदार संघातील विविध समस्यांचा निपटारा करण्यासाठी आज भातखळकर यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

मतदार संघातील विविध प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचा प्रश्न भातखळकर यांनी यावेळी उपस्थित केला. प्रकल्पग्रस्तांना यापुढे पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळतील किंवा २५ ते ४० लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून दिले जातील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. विशेष नियोजन आराखड्यातील मागाठाणे गोरेगाव या १२० फूटी रस्त्याबाबतही यावेळी चर्चा झाली. हा रस्ता येत्या एक ते दीड वर्षांत पूर्ण करण्याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

हे ही वाचा:

दोन वर्षात १५० हून अधिक वेब साईट्स, युट्युब चॅनेल्सवर बंदी

सर्वाधिक विजेतीपदे जिंकणाऱ्या कोरियाला नमवले; भारताच्या ज्युनियर महिला अजिंक्य

‘नितीशकुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत’

कोविन ऍपमधून लोकांची माहिती फुटल्याचे वृत्त खोटे!

या रस्त्यामुळे वाहातुकीच्या कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटणार आहे, लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मतदार संघातील महत्वाच्या समस्यांचा झटपट निपटारा केल्याबद्दल आमदार भातखळकर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version