मुलांच्या मनात विष कालवण्याचे काँग्रेसचे पाप

मुलांच्या मनात विष कालवण्याचे काँग्रेसचे पाप

आमदार अतुल भातखळकर यांनी दाखल केली तक्रार

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणानंतर काँग्रेसने महाराष्ट्रात सुरू केलेल्या आंदोलनाला आता वेगळेच वळण लागले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आंदोलनात चक्क लहान मुलांना सहभागी करण्यात आले होते. वारकऱ्यांची ही लहान मुले मोदींविरोधात आंदोलनात उतरविण्यात आली होती. त्याबद्दल आमदार भातखळकर यांनी   नाना पटोलेंवर कठोर टीका केली आहे.

आमदार भातखळकर यांनी यासंदर्भातील एक व्हीडिओ ट्विट करत मुलांच्या मनात कसे मोदीविरोधाचे विष कालविण्यात येत आहे, हे दाखवून दिले.

या व्हीडिओत एक महिला पत्रकार त्या आंदोलनातील वारकरी मुलांना प्रश्न विचारते की, तुम्ही आंदोलनात का सहभागी झाला आहात, तर आम्हाला माहीत नाही असे ती मुले म्हणतात. आम्हाला आंदोलनात भाग घ्या सांगितले म्हणून आम्ही आलो असेही ते म्हणतात. त्यातील एका मुलाला ती पत्रकार विचारते की, आंदोलनात का आला आहात तर तो मुलगा म्हणतो की, मोदी शिवरायांबद्दल काहीतरी बोलले म्हणून आंदोलनात आलो.

हे ही वाचा:

पुलवामा हल्ला आणि बदललेला भारत!

सोन्या-चांदीच्या दराला मोठी चकाकी!

एलोन मस्कचा न्यूरालिंक प्रकल्प धोक्यात?

पंतप्रधान मोदींच्या आगमनामुळे सीएम चन्नींचे हेलिकॉप्टर राहिले खाली!

 

आंदोलनात अशाप्रकारे लहान मुलांचा वापर केल्याबद्दल आमदार भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘मोदी द्वेषापायी खोटी माहिती देऊन अजाण बालकांच्या मनात देशाच्या पंतप्रधानबद्दल विष पेरण्याचे पाप काँग्रेस करत आहे. राजकीय आंदोलनासाठी लहान मुलांना वेठीला धरणाऱ्या नाना पटोले यांच्या विरोधात मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.’

आमदार भातखळकर यांनी तशी तक्रार समतानगर पोलिस ठाण्यात दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, समाजात दुही माजविण्याचे काम, द्वेष पसरविण्याचे काम केल्यास १५३ अ या कलमांतर्गत कारवाई करण्यात येते. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कलमाबरोबरच १५३ ब, २९५ अ, ५०५ आणि ८३ (२) व ७५ या कलमांचाही भंग केला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू केले आहे. विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर पटोले यांनी हे आंदोलन घेतले होते. पण नंतर त्यांना ते गुंडाळावे लागले. त्यात या लहान मुलांना सहभागी करण्यात आले होते.

Exit mobile version