भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या बाबतीत प्रतिक्रिया देताना राऊत यांच्यावर एफआयआर दाखल करावा अशी मागणी भातखळकरांनी केली आहे. तर मूळ विषयापासून लोकांचे लक्ष्य भरकटवण्यासाठी आशिष शेलार यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात राहणाऱ्या महिलेच्या आणि तिच्या मुलाच्या बाबतीत हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे जावं म्हणून आशिष शेलार यांनी न केलेल्या विधानावरून अशिष शेलार त्यांच्यावर आज मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. ते जे बोलले त्यासाठी ते आजच पोलीस स्टेशनला हजर झाले. ते जे बोलले होते त्याचे अधिकृत रेकॉर्ड त्यांनी कालच पोलिसांना पाठवून दिला होता. त्यामुळे राजकीय दबावातून शेलार यांच्यावर कारवाई करण्यात येत तेच. तेव्हा हा एफआयआर रद्द करण्यात यावा अशी आम्ही मागणी केली आहे असे भातखळकर यांनी सांगितले.
हे ही वाचा:
दिल्लीतील रोहिणी कोर्टात स्फोट, एक जखमी
महाराष्ट्र भाजपा सोशल मीडिया सेलच्या संयोजक पदी प्रकाश गाडे
आशीष शेलार यांना १ लाखाचा जामीन मंजूर
आशिष शेलारांना शांत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?
तर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज माझ्या एका ट्विट संदर्भात बोलताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आणि महिला कार्यकर्त्यांसाठी अतिशय असभय आणि घाणेरडा शब्द वापरला. संजय राऊत यांनी एकदा नव्हे दोनदा हा शब्द भाजपाच्या बाबतीत आणि भाजपाच्या महिलांच्या बाबतीत वापर केला. त्याच्या संदर्भात आम्ही तक्रार दाखल केली आहे आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल व्हावा अशी आम्ही मागणी करत आहोत. तर या संदर्भात राज्य महिला आयोग आणि केंद्रीय महिला आयोगाकडे जाण्याचा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.