आमदार भातखळकरांची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका
कालपासून महाराष्ट्रात रुदालीचा प्रयोग सुरू आहे. त्यापेक्षा या मुलाखतीला काडीचीही किंमत नाही. एवढीच जर तुम्हाला शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा होती, तर इतके दिवस कुठे होतात. कुठल्या बिळात लपून होता. गुंगीत असताना सरकार पाडले असे म्हणता मग गुंगीत होतात तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही? काल एकनाथ शिंदेवर टीका आज भाजपावर टीका यापेक्षा वेगळे काही सांगण्यासारखे नाही त्यांच्याकडे, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.
उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीही या मुलाखतीवर सडकून टीका केली.
भातखळकर एका वाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मला सहानुभूती द्या सहानुभूती द्या एवढेच बोलत राहायचे. मुख्यमंत्रीपदाच्या काळात या व्यक्तीने साधी मुख्यमंत्री मदतनिधीची सुरुवातही केली नाही. कधी मंत्रालयात फिरकले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या आमदारांना भेटले नाहीत. कुठला निर्णय घेतला नाही. आता मात्र १००-१५० लोकांच्या मीटिंग घेत आहेत. आता आजारपण कुठे गेले? कोरोना काळात आदित्य ठाकरे आणि हे कुठे होते? तेव्हा हिंडायला वेळ नव्हता. जनता त्राही त्राही करत होती.
हे ही वाचा:
२१००० कोटींहून जास्त खर्च तरी मुंबईतले रस्ते खड्ड्यात का?
सोनिया गांधींसाठी काॅंग्रेस कार्यकर्ते ट्रॅकवर उतरले; बाेरिवलीत राेखली साैराष्ट्र एक्सप्रेस
मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी
उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीला जेलमध्ये मारहाण
सगळं भाजपाला आपल्या बुडाखाली हवं असा आरोप करतात पण यांची इच्छा होती की, यांना सगळे आपल्या बुडाखाली हवे होते. म्हणून जनतेचा विश्वासघात करून सत्ता मिळविली. ही वस्तुस्थिती आहे.हिंदुत्व, मराठीचा मुद्दा सगळे खुंटीला टांगले. सत्तेसाठी सत्तापिपासू आणि असंस्कृत मुख्यमंत्री कोण असेल तर उद्धव ठाकरे. अकार्यक्षम, भ्रष्टाचाराने लडबडलेले सरकार कुठले असेल तर ते महाविकास आघाडीचे सरकार असेल याची इतिहासात नोंद असेल, असेही भातखळकर म्हणाले.