पोलखोल अभियानात आमदार अतुल भातखळकर यांचा घणाघात
मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेचा भ्रष्टाचार आणि महाविकास आघाडीच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलखोल अभियान घेण्यात आले. वॉर्ड २९ मध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या श्रोत्यांपुढे त्यांनी घणाघाती भाषण केले. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात याबद्दल मी माझ्या वतीने भाजपाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो, असे म्हणून त्यांनी भाषणाला प्रारंभ केला.
ते म्हणाले की, मी हा विचार करत होतो २९ वॉर्डची सभा आहे जर कांदिवली पूर्वची सभा ठेवली असती तर पूर्ण रस्ता बंद करावा लागला असता. सागरसिंग यांनी भाषणात म्हणाले काल रात्रीच्या घटनेबाबत म्हणाले. मी इतकी वर्षे राजकारणात आहे. माझे कुणा व्यक्तीशी संघटनेशी संघर्ष झाला नाही. पण ही लोकशाही आहे. यात जाहीर सभा घेणे आमचा मूलभूत अधिकार आहे. तेव्हा आम्ही कुणाला छेडणार नाही पण छेडले तर सोडणारही नाही. मी मुख्यमंत्र्यांचीही टीका करतो. कंबरेखाली वार करत नाही.
पोलखोल अभियानात अडथळे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यावरून आमदार भातखळकर यांनी आपली भूमिका मांडली.
त्यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेत जे चुकीचे चालले आहे त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी मी आहे. लोकांचा आवाज दाबू देणार नाही. हजारो कोटी कुठून आले तर घपले केले त्यातून ही प्रॉपर्टी आली. ही मुंबईच्या जनतेची आहे. आम्ही त्या प्रॉपर्टीवर जाऊ आणि तिथे बोर्ड लावू. ही संपत्ती मुंबईच्या जनतेची आहे ती त्यांना देऊ. इथे एक प्रसुतीगृह आहे पण ते जीर्ण अवस्थेत आहे. मी उंबरठे झिजवले पण अजूनही त्याचे टेंडरही नाही. कुणी चांगला माणूस मिळत नाही, असे ते म्हणतात. मी इशारा देतो. झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना मी आश्वासन देतो की जर या संदर्भात कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू.
आमदार भातखळकर म्हणाले की, आप्पापाडात ५०० सदनिका आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा या विभागातील लोकांसाठी मी ते राखीव केले. पण पालकमंत्र्यांनी सांगितले की, इथले लोक चेंबूरला जातील आणि चेंबूरचे लोक इथे येतील.
हे ही वाचा:
इलैयाराजा यांच्या पुस्तकातून मोदी-डॉ. आंबेडकर तुलनेमुळे अनेकांना पोटदुखी
‘गांधी कुटुंब सोडून अन्य कुणाकडेही काँग्रेसचे नेतृत्व द्या’
देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची विशेष भेट
येथील पुलाचा एस्कलेटर २ वर्षांपासून बंद आहे. मी धरणे धरले पण त्यात मूलभूत काही त्रुटी आहे, असे सांगण्यात आले. मात्र ज्या कंपनीकडून हे कंत्राट घेतले ती कंपनीच गायब आहे. तर टेंडर काढा म्हटल्यावर ५०-६० एस्कलेटरचे टेंडर काढून म्हणाले. सीनियर सिटीझन, गरोदर महिला यांना त्रास सहन करावा लागतो, याकडे कोण लक्ष देणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पाण्याचा प्रश्न हनुमाननगर, पोयसर, अनेक बड्या इमारतींना पाण्याची समस्या सतावत आहे. गेल्यावर्षी पाऊस चांगला होता. धरणे भरली मग पाणी का येत नाही. हाच तर महापालिकेचा कारभार आहे, अशा शब्दांत त्यांनी पाण्याचा प्रश्नही मांडला.