रासायनिक खतांच्या किंमती वाढल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नरेंद्र मोदींच्या सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने रासायनिक खतांवरील सबसिडी १४०% वाढवून खतांचे दर पूर्वी एवढेच केले आहेत. त्यावरून महाराष्ट्रातील भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये मोदी सरकारला शेतकऱ्यांचे खरे मित्र असे संबोधले आहे.
हे ही वाचा:
मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, रासायनिक खतांच्या सबसिडीत १४०% वाढ
मच्छीमारांच्या आक्रोशासमोर पालकमंत्र्यांची बोलती बंद
मुंबई महापालिकेच्या विरोधात भाजपा सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार
मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा
अतुल भातखळकर यांनी ट्वीटरवरून नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्वीटवरून मोदींचे अभिनंदन करताना त्यांना शेतकऱ्यांचे खरेखुरे मित्र देखील म्हटले आहे. अतुल भातखळकर ट्वीटमध्ये म्हणतात,
बाजारात युरियाच्या काढलेल्या भरमसाठ किमतींवर १४०% सबसिडी वाढवून मोदी सरकारने शेतकऱ्यांना पूर्वीच्याच दराने खत विकत घेण्याचा प्रचंड दिलासा दिलेला आहे. शेतकऱ्यांचे खराखुरे मित्र असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन
बाजारात युरियाच्या काढलेल्या भरमसाठ किमतींवर १४०% सबसिडी वाढवून मोदी सरकारने शेतकऱ्यांना पूर्वीच्याच दराने खत विकत घेण्याचा प्रचंड दिलासा दिलेला आहे. शेतकऱ्यांचे खराखुरे मित्र असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन🙏🙏💐💐
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 20, 2021
नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात कायमच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवल्याचे दिसले आहे. शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा अनेक अभिनव योजना मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात जाहीर केलेल्या दासीला आहेत. तसेच आर्थिक दृष्ट्याही शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने कायमचा मदतीचा हात दिला आहे. मोदी सरकारने रासायनिक खतांवरची सबसिडी १४० टक्क्यांनी वाढवली आहे. त्यामुळे ५०० रुपयांची सबसिडी आता १२०० रुपये झालेली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून रासायनिक खताची एक पिशवी त्याची मूळ किंमत २४०० रुपये आहे, ती आता शेतकऱ्याला १२०० रुपयाला उपलब्ध होणार आहे यासाठी सरकारकडून १४,७७५ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.