“यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही हे कसले विचारांचे सोने लुटणार?” असं म्हणत भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर टीका करताना भातखळकर यांनी हे विधान केले.
“सोनिया मातोश्रींचे जोडे उचलणाऱ्यांनी राजनाथ सिंह यांची लायकी काढावी हा किती मोठा विनोद. अहो ते जिंकून आलेत, तुमच्यासारखे पंतप्रधानांना फोन करून मागल्या दाराने मुख्यमंत्री थोडेच झालेत.” असं भातखळकर म्हणाले. राजनाथ सिंग यांनी नुकत्याच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सावरकरांनी गांधीजींच्या सांगण्यावरूनच दयायाचिका लिहिली होती, असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावर टीका करताना उद्धव ठाकरे ‘आपली लायकी आहे का?’ असं म्हणाले होते. उद्धव ठाकरेंनी संरक्षण मंत्र्यांची लायकी काढल्यानंतर भातखळकरांनी या ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.
पक पक पकाक ३
यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही हे कसले विचारांचे सोने लुटणार. यांना केवळ वसूली आणि वाझे माहीत. गुजरात होते म्हणून ड्रग्ज पकडले गेले. तुमच्या मंत्र्यांनी हर्बल तंबाखू म्हणून
विकून तिजोरी भरली असती. थोडे तुम्हालाही पाठवले असते.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 15, 2021
“राहुल गांधींची चाकरी स्वीकारल्यापासून हिंदुत्वाशी फारकत घेतली, आता समाजवादी पार्टीची बिर्याणी घरी येऊ लागलेली दिसते, कारण भारत माता की जय, ऐकून पोटात मुरडा येतोय.” असंही भातखळकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या सरकारने आंदोलनाला जाण्यापासून रोखल्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला होता. याचाच संदर्भ घेत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना काँग्रेस पक्षाशी केलेल्या युतीनंतर काँग्रेसच्या सर्व मित्र पक्षांची बाजू घेण्याची वेळ आता शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर आल्याचे दाखवून दिले.
हे ही वाचा:
भाजपाच्या इशाऱ्यानंतर तामिळनाडू सरकारने मंदिरं उघडली
‘घोटाळेबाज सरकारला घालविण्यासाठी अंदमान निकोबार जेलमध्येही जाईन!
उद्धव ठाकरे म्हणजे लायसन्स नसलेले ड्रायव्हर, शिवसेनेचाच नेता असे का म्हणाला?
घाटकोपर उड्डाणपुलाचे नियम गेले उडत; दुचाकीस्वारांचा मुजोरपणा
“यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही हे कसले विचारांचे सोने लुटणार. यांना केवळ वसुली आणि वाझे माहीत. गुजरात होते म्हणून ड्रग्ज पकडले गेले. तुमच्या मंत्र्यांनी हर्बल तंबाखू म्हणून विकून तिजोरी भरली असती. थोडे तुम्हालाही पाठवले असते.” असंही भातखळकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात गुजरातच्या मुंद्रा बंदरातून अफगाणिस्तानातून आलेले ड्रग्ज पकडल्याचा उल्लेख केला होता. भातखळकरांनी नवाब मलिक यांनी त्यांच्या जावयाच्या प्रकरणातील ‘हर्बल तंबाखू’ची आठवण करून दिली. त्याचबरोबर सचिन वाझे आणि १०० कोटींची वसुली प्रकरणाचीही आठवण करून दिली.