रेमडेसिवीरवरून अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

रेमडेसिवीरवरून अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना त्यासाठी काहीही प्रयत्न न करणाऱ्या ठाकरे सरकारचे मंत्री गुजरातमधल्या रेमडेसिविरच्या मोफत वाटपावरून बोलत आहेत. त्यांना आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटरवरून खडे बोल सुनावले आहेत. त्याबरोबरच कोविड केंद्रातूनच होत असलेल्या रेमडेसिविरच्या काळ्या बाजारावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

राज्यात रेमडेसिविर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनावरील उपचारांत रेमडेसिविर प्रभावशाली औषध म्हणून वापरले जात आहे. ठाकरे सरकारकडून वारंवार या औषधाचा काळाबाजार करू नका असे केवळ आवाहन केले जात आहे. पिंपरी चिंचवड येथील कोविड सेंटरमधूनच या औषधाचा काळा बाजार चालू असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. त्यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर टिका केली आहे.

हे ही वाचा:

आजपासून देशभरात ‘लसोत्सव’

दिल्लीचा दिमाखदार विजय

वाझे टीआरपी घोटाळ्यातही

त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “पिंपरी चिंचवडच्या कोविड सेंटरमधूनच रेमडेसिविर चा काळा बाजार सुरू होता. सत्ताधारीच पोलिसांकरवी खंडणी वसूल करत असतील तर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना कोण थांबणार आहे? वरून विरोधी पक्षांनी राजकारण करू नये म्हणून मनभावी सल्ला देणार… चोर तो चोर वर शिरजोर…” या शब्दात त्यांनी सरकारवर टिका केली आहे.

दुसरीकडे राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना मंत्री केवळ टिका करत असल्याचे चित्र समोर येत आहे. गुजरातमध्ये भाजपा कार्यालयातून रेमडेसिविर मोफत वाटण्यात आले होते. त्यावरून, राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी टिका केली होती. त्यावर देखील अतुल भातखळकरांनी सरकारला आरसा दाखवला आहे.

“रेमडेसिवीरचे भाजपा कार्यालयात मोफत वाटप केल्यामुळे राष्ट्रवादीचा संताप होण्याचे कारण काय? सरकार म्हणून तुम्ही तोडपाणी शिवाय काहीच करत नाही, दुसरा काही काम करतोय त्याचे तरी कौतुक करा.” या शब्दात त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले आहे.

Exit mobile version