24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणलोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत!

लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत!

Google News Follow

Related

‘विरोधात लढले तर लोक जोड्याने मारतील, ही भीती खरी आहे. लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत, फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे,’ अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शिवसैनिकांशी साधलेल्या संवादात आपला सहकारी पक्ष काँग्रेसवर प्रहार करताना म्हटले होते की, राजकीय पक्ष लोकांची अडचणी सोडविण्याऐवजी स्वबळाच्या घोषणा देत बसलो तर लोक जोड्याने मारतील. त्यावर भातखळकर यांनी ट्विट करत सणसणीत भाष्य केले. ते ट्विटमध्ये म्हणतात की, एकमेकांशी लढून, गरळ ओकून, सत्तेसाठी एकत्र आलेल्यांच्या गळ्यात लोक काय हारतुरे घालणार आहेत?

हे ही वाचा :

सरकारचा अजब कारभार; कोविड सेंटरमध्ये शिकाऊ वैद्यकीय तज्ज्ञ

हात की सफाई; इकडचा कचरा तिकडे…

अजित पवारांच्या कार्यक्रमात कोविड नियमांना हरताळ

शस्त्रास्त्र साठ्यासह एकाला केले जेरबंद

या भाषणात हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भातखळकर यांनी जाब विचारला की, काँग्रेसच्या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी झाली तेव्हा मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले. एफआयआर सोडा, ज्यांना निषेधही करावासा वाटला नाही तो पक्ष ब्रिगेडी असू शकतो, हिंदुत्ववादी नाही. तुमची योग्यता टिपू जयंती साजरी करण्याचीच. हिंदुत्ववादी आहोत यावर लोकांचा विश्वास बसावा यासाठी एखाद्या फिल्मी पीआर कंपनीला कंत्राट का देत नाही, सोनिया सेना, असाही खणखणीत सवाल भातखळकरांनी विचारला आहे.

या संवादात हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. सत्तेसाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत लाचार होणार नाही, उगाच कुणाची पालखी वाहणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विचारताना भातखळकर मार्मिक टिप्पणी करतात की, पालखी वाहणार नाही, पण कुबड्या घेणार! शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही, हे जरा फायबर जनेऊधारी, बोगस दत्तात्रय गोत्रवाल्या लाडक्या राहुल गांधी यांना सांगा, अशीही बोचरी टीका भातखळकर यांनी केली आहे.

रामद्रोही पक्षांच्या मांडीवर बसून त्यांच्या तालावर नाच केला नसता तर उठसूट आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हे सांगण्याची गरज भासली नसती, असा चिमटाही भातखळकर यांनी काढला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा