मढमधील अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला कुणाचा वरदहस्त?

आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत उठविला आवाज

मढमधील अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला कुणाचा वरदहस्त?

मालाड, मढ एरंगळ येथे आमदार अस्लम शेख यांनी उभारलेल्या अनधिकृत स्टुडिओजचे प्रकरण आता चांगलेच गाजते आहे. विधिमंडळात या अनधिकृत स्टुडिओचा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपाचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवत त्याच्या सखोल चौकशीची मागणी केली.

याबाबत अतुल भातखळकर यांनी न्यूज डंकाशी बातचीत केली. तेव्हा ते म्हणाले की, मालाड मढ, एरंगळ या ठिकाणी सीआरझेड याक्षेत्रात कलेक्टरची जमीन आहे. तिथे कुठलीच गोष्ट करता येत नाही. पण चुकीच्या परिपत्रकाचा आधार घेऊन  तीन स्टुडिओ उभे करण्याची परवानगी मागण्यात आली. तिथे २५-३० स्टुडिओ उभे राहिले. ही परवानगी देताना तात्पुरती बांधकामे करण्यास परवानगी होती, पण ६० फुटाचे लांब स्टुडिओ उभारले गेले. पक्के बांधकाम केले. पेव्हर ब्लॉक टाकले गेले. यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालेला आहे.

हे ही वाचा:

मेधा पाटकर यांच्या भूमिकेत होते आदित्य ठाकरे…

कोकणातील रस्तेदुरुस्ती गुरुवारपर्यंत पूर्ण करा

‘मढ येथील अस्लम शेख यांचा स्टुडिओ पाडा’

गौतम अदानींचा ‘एनडीटीव्ही’त मोठा हिस्सा

 

हे सगळे करावे म्हणून एमटीडीसीच्या जागेवर भरणीची परवानगी दिली. ती भरणी करताना एकरामागे १ हजार झाडे लावा ही अट होती. ती पायदळी तुडविली गेली. कांदळवनाची एनओसी देत असताना झाडे आहेत याचा उल्लेख होता ती झाडे गाडून लाखो ट्रक माती टाकली गेली. अनधिकृत स्टुडिओंचे जे काम केले गेले, त्याचे ढिगारे एमटीडीसीच्या जागेवर उपयोग केला गेला. तत्कालिन पर्यावरण मंत्री, तत्कालिन शहराचे पालकमंत्री आणि त्या विभागातील विद्यमान आमदार यांचा यात काही भूमिका आहे का, याची चौकशी करावी आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी २९३च्या चर्चेवर करताना मी केली. याला नक्कीच कुणाचा तरी वरदहस्त आहे. अधिकारी आणि सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे, अशी माझी मागणी आहे.

Exit mobile version