मराठी माणसाची घरे तोडणाऱ्या ठाकरे सरकारकडून भातखळकरांना अटक

मराठी माणसाची घरे तोडणाऱ्या ठाकरे सरकारकडून भातखळकरांना अटक

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कांदिवली पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांना अटक करण्यात आली आहे. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिल्यामुळे भातखळकर यांच्यावर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कुरार येथील मेट्रो प्रकल्पात आपली हक्काची घरे गमावलेल्या मराठी माणसाचे योग्य प्रकारे पुनर्वसन होऊन हक्काची घरे मिळावी यासाठी भातखळकर आंदोलन करत होते.

कुरार येथील मेट्रो प्रकल्पात स्थानिक मराठी माणसांची घरे एमएमआरडीएने तोडली. तर सक्तीने त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यात आले. या पिडीत नागरिकांचे कुरार येथेच पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी भाजप आग्रही आहे. ‘गिरगाव पॅटर्न’ नुसार या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी भाजपाची मागणी आहे. या मागणीसाठीच भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात शनिवार, १७ जुलै रोजी आंदोलन सुरू होते.

हे ही वाचा:

लोणकरच्या कुटुंबियांनाच घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांची भेट

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या

“मिल जाएँगे हर मोड़ पर गड्ढे-तालाब”

पंतप्रधान मोदींनी केले रोबोटिक्स आणि ॲक्वेटिक्स गॅलरीचे लोकार्पण

पण आमदार भातखळकर यांचा आणि या आंदोलकांचा आवाज दाबण्याचा घाट ठाकरे सरकारकडून घालण्यात आला. त्यासाठी लोकांना मारहाण करून आमदार अतुल भातखळकर यांना अटक करण्यात आली. गोरेगाव पोलिसांनी ही कारवाई केली असून भातखळकर यांना आरे पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या विषयी माहिती दिली असून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदघाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत.

अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.

Exit mobile version