बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेवर भारताने बहिष्कार टाकला आहे. हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात रिलेदरम्यान भारतासोबतच्या गलवान संघर्षात जखमी झालेल्या चिनी कमांडरलाच मशालवाहक म्हणून जबाबदारी सोपवल्यानंतर भारताने हा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर भारतानेही या स्पर्धेवर बहिष्कार टाकत निषेध नोंदवला आहे. जगभरातून या घटनेवर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना अमेरिकेनेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी भारत- चीन सीमा वादाचा प्रश्न असेल तेव्हा आम्ही शांततापूर्ण संवादासाठी प्रयत्न करू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच इंडो- पॅसिफिकमध्ये समृद्धी, सुरक्षा वाढवण्यासाठी आम्ही मित्र राष्ट्रांसोबत उभे आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनच्या मुद्यावरून अमेरिका आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा अमेरिका-भारत संबंधांवर काहीही परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेच्या या स्पष्टीकरणाचे आमदार अतुल भातखळकर यांनी कौतुक केले असून त्यासंबंधी ट्विट केले आहे. बीजिंग हिवाळी ऑलिंपिकमध्ये मशालवाहक म्हणून, चीनने गलवान चकमकीमधील सैनिकाला घेतले असल्यामुळे भारताने या ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला आहे आणि या प्रकरणात अमेरिकेने भारताच्या बाजूने उभे राहणे हे मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय कूटनीतीचे प्रचंड यश असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. ‘मै देश नही झुकने दुंगा’ असेही अतुल भातखळकर यांनी लिहिले आहे.
बीजिंग हिवाळी ऑलिंपिकमध्ये मशालवाहक म्हणून, चीनने गलवान चकमकीमधील सैनिकाला घेतलं असल्यामुळे भारताने या ऑलिंपिकवर बहिष्कार टाकलाय.
या प्रकरणात अमेरिकेने भारताच्या बाजूने उभे राहणे हे मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय कूटनीतीचे प्रचंड यश आहे.
मै देश नही झुकने दुंगा 🙏🙏🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/hOC6g4ytUO— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 4, 2022
हे ही वाचा:
पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू
बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
माघी गणेशोत्सव का साजरा केला जातो?
दक्षिण आशियातील सर्वाधिक रामसार क्षेत्र भारतात
ऑलिम्पिकसाठी बुधवारी मशाल फेरी काढण्यात आली, त्यामध्ये मशालवाहक म्हणून फाबाओच्या हाती मशाल सोपविण्यात आली होती. फाबाओ हा चीनच्या लष्करात वरिष्ठ अधिकारी असून १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षावेळी तो उपस्थित होता. त्यामुळे या निर्णयाचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ‘ऑलिम्पिक स्पर्धेचे राजकीयीकरण करण्याचा चीनचा निर्णय दुर्दैवी आहे. त्याचा निषेध म्हणून भारतीय राजनैतिक शिष्टमंडळ ऑलिम्पिक स्पर्धांच्या उद्घाटन किंवा समारोपाच्या समारोपाला उपस्थित राहणार नाही,’ अशी माहिती परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तसेच दूरदर्शननेदेखील ऑलिम्पिकचा उद्घाटन आणि समारोपाचा सोहळा लाइव्ह प्रक्षेपित करणार नसल्याचे जाहीर केले आहे.