‘…पाकिस्तानातील मुस्लिम लीग आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षांनाही मविआत सामील करतील’

‘…पाकिस्तानातील मुस्लिम लीग आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षांनाही मविआत सामील करतील’

एमआयएम महाविकास आघाडी सरकारसोबत युती करण्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर राज्याच्या राजकारणातही चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर आणि नितेश राणे यांनीही सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, “महाविकास आघाडीत एमआयएम देखील सामील होणार? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे वृत्त आहे. भाजपला रोखण्यासाठी उद्या पाकिस्तानमधील मुस्लिम लीग आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीत सामील करून घेतल्याची बातमी आली तरी आश्चर्य वाटणार नाही,” असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

आमदार नितेश राणे यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “वाह.. एमआयएमची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी.. कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे.. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे.. खरंच, करून दाखवलं!!” असा टोला नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

हे ही वाचा:

योगी आदित्यनाथ या दिवशी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

कोल्हापूरमधून जप्त केला २५ लाखांचा मद्यसाठा

रशियाने युक्रेनवर सहा क्षेपणास्त्रे डागली

युपीमध्ये रंग लावण्यावरून दोन गटांत हाणामारी, दोघांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र युती शक्य नसल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version