“कुख्यात युसुफ लकडावाला प्रकरणी पवारांची चौकशी होणार काय?”

“कुख्यात युसुफ लकडावाला प्रकरणी पवारांची चौकशी होणार काय?”

राज्यात सध्या हनुमान चालिसा पठनावरून राजकारण तापलेले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणांवर गंभीर आरोप केले होते. राणा यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित आणि ईडीने अटक केलेल्या युसुफ लकडावाला याच्याकडून ८० लाख घेतले होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर आणि भाजपा नेते मोहित कंभोज यांनी काही फोटो शेअर करत शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटरवर युसुफ लकडावालासोबतचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. “कुख्यात युसुफ लकडावाला प्रकरणी पवारांची चौकशी होणार काय?” असा सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

तसेच भाजपा नेते मोहित कंभोज यांनी ट्वीटवर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एका फोटोत युसूफ लकडावाला आणि शेजारी शरद पवार आहेत. या फोटोवर त्यांनी संजय राऊत यावर काय बोलाल असा सवाल उपस्थित केला आहे. लकडावाला आणि शरद पवार यांचे संबंध काय आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. मोहित कंभोज यांनी अजून एक युसुफ लकडावाला आणि माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबतचा फोटो देखील शेअर केला आहे.

हे ही वाचा:

“जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर आता आकारत असलेला अतिरिक्त कर परत करणार का?”

भारताचे फ्रान्स फॉलोइंग

Twitter बोलणार मस्क बोली

‘महाराष्ट्र, केरळ, बंगालने पेट्रोलवरचा कर कमी केला नाही’

खासदार नवनीत राणा यांनी दाऊदशी संबंधित युसूफ लकडावाला याच्याकडून ८० लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच नवनीत राणा यांनी घेतलेल्या कर्जाबाबत ईडी चौकशी करेल का? असा सवालही त्यांनी ट्विटमधून विचारला होता.

Exit mobile version