राष्ट्रवादी काँग्रेसचा रविवार, ११ सप्टेंबर रोजी दिल्लीत राष्ट्रीय मेळावा पार पडला. या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांच्या आगमनावेळी एक गाणं वाजवण्यात आलं. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्या गाण्याशी संबंधित व्हिडीओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओत जे गाणं वाजतंय ते ‘जोधा अकबर’ चित्रपटातील आहे. ‘अज़ीम-ओ-शान शहंशाह’ असे या गाण्याचे बोल आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपाने निशाणा साधला आहे.
दिल्लीमधली ‘शहंशाह’ हीच खरी शरद पवार यांची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर शहंशाहचे गुणगान होत आहे. राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे?” अशी खोचक टीका भाजपाकडून करण्यात आली आहे.
मरहबा जनाब @PawarSpeaks साहब!
अज़ीम-ओ-शान शहंशाह
फ़ुरवा रावा, हमेशा हमेशा सलामत रहे।दिल्लीमधली 'शहंशाह' हीच खरी ओळख आहे पवार साहेबांची.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर शहंशाहचे गुणगान होत आहे.
राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे? pic.twitter.com/UUYBEQRyXP
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 11, 2022
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या या १२०० वस्तूंचा होणार लिलाव
राडा करणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची शाबासकीची थाप
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांनी सांगितला पेशव्यांचा पराक्रम
प्रभादेवीत ‘त्या’ ठिकाणी सापडली काडतुसाची रिकामी पुंगळी
दरम्यान, भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील शरद पवार यांच्यावर घाणाघाती टीका केली आहे. “साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह..” अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
साडेतीन जिल्ह्याचे
अझीम ओ शान शेहेनशाह… pic.twitter.com/3NB8OtiBL6— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2022
“दिल्लीच्या अधिवेशनात अझीम ओ शान शहेनशाह हे गाणं वाजवलं. आम्हीही तेच म्हणत होतो हे जाणते राजे नसून मुघल शहेनशाहच आहेत. कोणते? ते आपल्याला माहितीच आहे,” असा सणसणीत टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
दिल्लीच्या अधिवेशनात अझीम ओ शान शहेनशाह हे गाणं वाजवलं.
आम्हीही तेच म्हणत होतो हे जाणते राजे नसून मुघल शहेनशाहच आहेत.
कोणते?
ते आपल्याला माहितीच आहे…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2022