राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते यांच्यात चांगलेच राजकीय युद्ध सुरू आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनादरम्यान विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईडी या केंद्रीय यंत्रणेबद्दल वक्तव्य करतान म्हणाले की, “ईडी आहे का घरगडी आहे, हेच माहित नाही.” यावर अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घाणाघाती टीका केली आहे. “हो घरगडीच आहे, काळ्या पैशाने बरबटलेल्या थोबाडांची उत्तम धुलाई करतो,” असे अतुल भातखळकर म्हणाले.
हो घरगडीच आहे, काळ्या पैशाने बरबटलेल्या थोबाडांची उत्तम धुलाई करतो. pic.twitter.com/Oab5VoR2TF
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 25, 2022
पुढे उद्धव ठाकरे असे म्हणाले की, “तुम्हाला सत्ता पाहिजेत ना. सगळ्यांच्या समोर सांगतो. पेनड्राईव्ह गोळा करू नका. मी तुमच्यासोबत येतो. याच्यावर टाच मार, त्याच्यावर टाच मार, कुटुंबीयांवर धाडी टाक हे जे काही तुम्ही जे चाळे केले आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात.” यावरून अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांना टोला लगावला आहे.
हे ही वाचा:
‘कोरोना काळात शालेय शिक्षणासाठी फी कमी न करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य’
आमदारांना मुंबईत घरे मिळणार, पण…
“मैं आदित्यनाथ योगी…” दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री म्हणून शपथ
नागराज मंजुळे आता डॉक्टर नागराज मंजुळे!
मुख्यमंत्री फेसबुकी शैलीत सभागृहात बोलले. मला अटक करा, पण शिवसैनिकांना त्रास नको असं म्हणाले.
मुख्यमंत्री महोदय, अटकेचा मामला ऐच्छिक नसतो. जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो 'कायदेश्वर'.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 25, 2022
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “मुख्यमंत्री फेसबुकी शैलीत सभागृहात बोलले. मला अटक करा, पण शिवसैनिकांना त्रास नको असं म्हणाले. मुख्यमंत्री महोदय, अटकेचा मामला ऐच्छिक नसतो. जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो ‘कायदेश्वर’,” असे म्हणत अतुल भातखळकर यांनी खोचक टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.