पंतप्रधानांनी परीक्षांसंदर्भात मुलांशी सुसंवाद साधला ही अभिमानाची गोष्ट!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आभार

पंतप्रधानांनी परीक्षांसंदर्भात मुलांशी सुसंवाद साधला ही अभिमानाची गोष्ट!

‘परीक्षा पे चर्चा’च्या सहाव्या  पुष्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांशी समोरासमोर संवाद साधला. म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

शिंदे म्हणाले की, एवढ्या मोठ्या पदावर असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षेबाबत मुलांशी चर्चा करत होते, हि खरंच खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणूनच आपण सर्वांनी त्याचे आभार मानले पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे क्रमांक २३ , किसन नगर येथील महापालिका शाळेत स्वतः उपस्थित राहून संवादाचा आनंद घेतला  आणि यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना आगामी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांसाठी अनेक शुभेच्छाही दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे’ सरकारी शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते म्हणाले की, त्यांच्या आईच्या निधनानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत त्यांच्या कामात व्यस्त असतात. यावरून पंतप्रधान देशा प्रती किती समर्पित आहेत हे दिसून येते. मला वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय उत्तम प्रकारे दिली असून मुलांच्या मनातील भीती आता बऱ्याच प्रमाणांत दूर झाली असेल अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘प्रत्येक मुलाने परीक्षा एखाद्या सणाप्रमाणे साजरी करावी’. यासोबतच त्यांनी सर्व मुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘परीक्षा योद्धा’ हे पुस्तक वाचण्याचा सल्लाही यावेळेस दिला. मी सुद्धा सरकारी शाळेचा विद्यार्थी  मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “मी देखील या शाळेचा विद्यार्थी झालो आहे. मुलांनी कधीही असा विचार करू नये की आपण सरकारी शाळेत शिकतो, तर भविष्यात त्यांना कोणत्याही स्पर्धेला सामोरे जावे लागणार नाही. मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर बरेच काही आपण साध्य करू शकतो सर्व मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.”

‘परीक्षा पे चर्चा’चे सहावे पुष्प  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की, पालकांनी मुलांवर त्यांच्या सामाजिक स्थितीमुळे दबाव आणू नये. त्याचबरोबर कोणत्याही अपेक्षांच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना यावेळेस दिला.आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ या वार्षिक संवादाच्या ‘सहाव्या  पुष्पात’  विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मोदी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या संवादादरम्यान पंतप्रधानांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी सुद्धा संवाद साधला आणि तणाव, परीक्षांशी संबंधित समस्यांवर चर्चा केली.

शेवटी काय म्हणाले पंतप्रधान

एका विद्यार्थ्याने कॉपी करण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, कॉपी करणे एखाद्याला एक-दोन परीक्षांमध्ये मदत करू शकते, पण त्याचा आपल्या आयुष्यात दीर्घकाळ फायदा होत नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, त्यांनी कधीही ‘शॉर्टकट’ मार्ग स्वीकारू नये. विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आपल्या जीवनात पुढे जाण्यास नेहमीच मदत करतील, असे पंतप्रधान शेवटी म्हणाले.

Exit mobile version