उत्तर प्रदेशमध्ये सहाव्या टप्प्यातील निवडणुकीनंतर राजकीय पक्षांत खळबळ माजली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी दुपारी वाराणसीच्या पिंद्रा भागात जाहीर सभेला संबोधित करण्यापूर्वी बाबा विश्वनाथ यांच्या दरबारात हजेरी लावली होती. याआधीही एक दिवस आधी ममता बॅनर्जी यांनीही बाबा विश्वनाथ यांच्या दरबारात हजेरी लावली होती. हे पक्ष बनरास मध्ये आपली प्रतिमा बलवान करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर यांचा टिकाव लागणे अशक्य आहे.
ज्यांनी बाबा विश्वनाथ दरबारात हजेरी लावली त्यांनी एकेकाळी रामाचे अस्तित्व नाकारले होते. या पक्षाचे नेतेही हे मंदिर बघायला कधी आले नसते. पण आता आगामी निवडणुकीत बाबांना भेटायला हे पक्ष आले आहेत. याच विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी जेव्हा गंगेत स्नान करत होते तेव्हा राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. आणि तेच लोक आता विश्वनाथ येथे जाऊन पूजाअर्चा करत आहेत.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात आहेत. सातव्या टप्प्यातील मतदान ७ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी काशीमध्ये निवडणूक रॅली काढली आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोन दिवसांपासून कबीर मठात आहेत. आज त्यांनी बनारसच्या रस्त्यांवर फिरून जनतेला काँग्रेसला मत देण्यासाठी आवाहन करत आहेत. मात्र राहुल गांधींनी हिंदूंच्या परंपरेवर निशाणा साधून राजकारण केले आहे हे सर्व जनतेला माहिती आहे.
हे ही वाचा:
भारतीय संघापुढे श्रीलंका आव्हान उभे करणार?
शतकांच्या कसोटी यज्ञांतून उठली विराट ज्वाला
सर्व कामकाज बाजूला ठेवून ओबीसी आरक्षणावर चर्चा करा
‘एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण अशक्य’
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी समाजवादी पक्षाच्या समर्थनार्थ दशाश्वमेध घाटावरील आरतीला हजेरी लावली आणि गुरुवारी सपा आघाडीच्या पक्षांसोबत रॅली काढली आणि सपाला मते मागितली आहेत. निवडणूक आल्यावर या नेत्यांनी मंदिरात हजेरी लावली आहे.