25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरदेश दुनियाइस्रायली कंपनीकडून लोकसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न; भाजपाविरोधी अजेंडा चालवल्याचा आरोप

इस्रायली कंपनीकडून लोकसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न; भाजपाविरोधी अजेंडा चालवल्याचा आरोप

ओपन एआयचा खळबळजनक दावा

Google News Follow

Related

भारतात सध्या लोकसभा निवडणूक सुरू असून या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे. देशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप केले जात असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चॅट जीपीटी हे आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचं टूल बनवणारी इस्रायली कंपनी ओपन एआयनं भारतातील सध्याच्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात एक खळबळजनक खुलासा केला आहे.

विरोधकांनी भाजपच्या विरोधात अजेंडा राबवण्यासाठी एआयचा वापर केल्याचं बोलण्यात येत आहे. वृत्तांनुसार, इस्रायलची कंपनी STOIC ने एआय च्या मदतीने भारतातील लोकसभा निवडणुकीदरम्यान काल्पनिक युजर आणि त्यांचे बायो तयार केले. या काल्पनिक व्यक्तींच्या सोशल मीडिया हँडलवरुन विविध प्रकारच्या पोस्ट केल्या गेल्या. त्यानंतर अनेक बनावट अकाऊंट्सही बनवली गेली. याच बनवाट अकाऊंट्सवरुन सोशल मीडियावर पोस्टवर कमेंट्स केल्या गेल्या जेणेकरून हा संवाद खरा वाटावा.

अहवालात दावा करण्यात आला आहे की इस्रायल-आधारित कंपनीने भारतावर लक्ष केंद्रित करून अनेक टिप्पण्या केल्या, ज्यात सत्ताधारी भाजपवर टीका आणि विरोधी काँग्रेसची प्रशंसा समाविष्ट आहे. ओपन एआयने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात म्हटलं आहे की, इस्राईलची एक कंपनी STOIC ने गाझा युद्ध आणि भारतातील सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान सोशल मीडिया अकाऊंट्स तयार केले. मे महिन्यात या बनावट अकाऊंट्सवरुन भारताबाबत कमेंट्स सुरु झाल्या. यामध्ये सत्ताधारी पक्षांवर टीका केली गेली तर विरोधकांचं कौतुक केलं गेलं. या अहवालानुसार, या गोष्टी लक्षात आल्यानंतर केवळ २४ तासांतच थांबवल्या गेल्याचा दावाही ओपन एआयनं केला आहे. ओपन एआयनं म्हटलं आहे की, इस्राईलमधून ऑपरेट केल्या जाणाऱ्या अशी अनेक सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केली गेली. फेसबूक, इन्स्टाग्राम, एक्स आणि युट्यूबवर हे अकाऊंट्स तयार करण्यात आले होते. या अकाऊंट्सद्वारे विविध प्रकारच्या भाजविरोधी पोस्ट केल्या गेल्याचंही या अहवालात म्हटल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.

हे ही वाचा:

लोकशाहीच्या उत्सवाचा अंतिम टप्पा; ५७ जागांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाला पोलीस कोठडी

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक

मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्रीकची संधी…

दरम्यान, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी यावर टीका करत आपले मत मांडले आहे. त्यांनी पोस्ट करत लिहिलं आहे की, आता हे पूर्णपणे स्पष्ट झालंय की, भारतातील काही राजकीय पक्षांनी परदेशातील कंपन्यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लोकशाहीसाठी हा धोका आहे. याची सखोल चौकशी करुन त्याचा पर्दाफाश करण्याची गरज आहे. हा खुलासा यापूर्वीच व्हायला हवा होता, कारण आता निवडणुका संपल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा