मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने मंत्रालयाच्या समोर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. राजू चन्नपा हुनगुंडे असे आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, त्याने यावेळी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा गावातील राजू चन्नापा हुनगुंडे हा रहिवासी आहे. याने मंत्रालयासमोर आपल्या कुटुंबासह अंगावर रॉकेल ओतून घेत मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. राजू यांनी नांदेड जिल्ह्यातील पालम रोड धानोरा काळे येथील जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचे काम केले. ज्या कंत्राटाची किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे. त्यापैकी राजू यांना फक्त १४ लाख रुपये देण्यात आले आहे. जेव्हा हुनगुंडे यांनी कामाचे उर्वरित पैसे मागितले तेव्हा त्यांना कुटुंबासह मारहाण करण्यात आली. असा गंभीर आरोप राजू यांनी यावेळी केला आहे.
या प्रकरणानंतर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचीदेखील भेट घेतली होती. परंतु तरीदेखील काम झाले नाही. त्यामुळे अखेर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे राजू यांनी सांगितले.
हे ही वाचा:
गल ट्रान्सलेटमध्ये संस्कृतचा अंतर्भाव
आम्ही घरूनच काम करणार, म्हणत कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा
संभाजी राजेंच्या नव्या संघटनेची घोषणा
मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले
राजू हे रस्त्याच्या कामाचे कंत्राट घेतात. राजू यांनी नांदेड जिल्हयातील पालम रोड धानोरा काळे येथील जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचे काम केले आहे. ज्यासाठी त्यांना १ कोटी ७० लाख रुपयांचे पैसे येणे होते. मात्र फक्त १४ लाख रुपयेच आले आणि जेव्हा त्यांनी उर्वरित पैसे मागितले तेव्हा त्यांना कुटुंबासह मारहाण करण्यात आली.