बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसा सुरूच आहे. गेल्या आठवड्यात कुमिलामध्ये दुर्गा पूजा उत्सवांच्या दरम्यान कुराणची अपवित्रता केल्याचा आरोप करून हिंदूंच्या कत्तली सुरु झाल्या. रंगपूरच्या पीरगंज उपजिल्ल्यातील एका गावात इस्लामिक जमावाने घरांवर हल्ला केला. हिंसाचाराचे कारण, पोलिसांनी सांगितले की, “इस्लामिक कट्टर पंथीयांना कुराणविषयी अपमानास्पद सामग्री असलेली फेसबुक पोस्ट सापडली होती, असे मानले जाते की हे एका हिंदू व्यक्तीने केले आहे.”
स्थानिक युनियन परिषदेचे अध्यक्ष मोहम्मद सदेकुल इस्लाम यांच्या मते, “रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यात सुमारे ६५ घरे जाळण्यात आली, परिणामी किमान २० घरे पूर्णपणे जळून खाक झाली. हल्लेखोर इस्लामचा आरोप आहे की, जमात-ए-इस्लामी (जेईआय) आणि त्याची विद्यार्थी संघटना इस्लामी छात्र शिबिराच्या स्थानिक युनिटचे होते.
दरम्यान, या हल्ल्यावर बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहम्मद कमरुझ्झमान म्हणाले की, “तणाव वाढताच फौज घटनास्थळी दाखल झाली आणि हिंदूंच्या घराची सुरक्षा केली. आम्ही त्यांचे घर वाचवण्यात यशस्वी झालो पण हल्लेखोरांनी जवळपासच्या १५ ते २० घरांना आग लावली.”
अग्निशमन सेवा रात्री १० च्या सुमारास एकत्र करण्यात आली आणि सोमवारी पहाटे ३ पर्यंत घटनास्थळी दाखल झाली होती. तेंव्हा मृत्यू किंवा जखमांची त्वरित माहिती नव्हती.
हे ही वाचा:
शिवसेना-राष्ट्रवादीची ठाण्यात ‘लसी’ खेच
डेरा सच्चा सौदाच्या गुरमित रामराहीमचा जन्म जाणार तुरुंगात
उदय सामंत, गडाख, अब्दुल सत्तार हे काय १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत का?
काँग्रेसच्या बैठकीत सरदार पटेल यांचा पुन्हा अपमान
देशातील शीर्ष नेतृत्वाने दखल घेतल्यानंतरही बांगलादेशमध्ये हिंदूंना लक्ष्य करणारे हल्ले सुरू आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या धर्माची पर्वा न करता गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे वचन दिले आहे, तर गृहमंत्री असदुझमान खान यांनी रविवारी सांगितले की, दुर्गा पूजा पंडलवरील हल्ले “पूर्वनियोजित” होते. त्यात सापडलेल्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल.”