भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला चुकीचा असल्याचे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. राज्यात कोणत्याही नागरिकाला सुरक्षितपणे फिरता आले पाहिजे असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे आता अजित पवार यांनी आपल्याच मित्र पक्षाला घरचा आहेर दिल्याची चर्चा रंगली आहे.
खार पोलिसांनी अटक केलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर राणा दांपत्याला पोलिस स्टेशनला भेटून निघाले असताना भाजपाचे आक्रमक नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली आणि त्यात फुटलेली काच लागून त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली. या प्रकरणावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयात आपले मत व्यक्त केले आहे.
रविवार, २४ एप्रिल रोजी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला चुकीचा असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात कोणत्याही नागरिकाला सुरक्षितपणे वावर करता आला पाहिजे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. तर या प्रकरणात दोन्ही बाजुंनी तक्र्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस योग्य प्रकारे तपास करून कारवाई करतील असे पवार म्हणले.
हे ही वाचा:
राणा दाम्पत्यांविरोधात दुसरा गुन्हा दाखल
‘माझा दुसरा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न’
मुंबई पोलीस आयुक्त उद्धव ठाकरेंचे चपरासी आहेत का?
राणा दांपत्याला भेटून येताना किरीट सोमय्यांवर हल्ला; गाडीची काच फुटून जखमी
तर यावेळी त्यांनी राणा दाम्पत्याला झालेल्या अटकेच्या संदर्भातही मत व्यक्त केले आहे. सर्व बाजूंनी संयम ठेवणे गरजेचे आहे असे अजित पवार म्हणाले. तर कोणीही जाणीवपूर्वक प्रक्षोभक विधाने करू नयेत किंवा कृतीही करू नये असे पवार यांनी म्हटले आहे.