मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडून एनआयएकडे दिला जाण्यापूर्वी एटीेएसने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एक निलंबित पोलिस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि एक बुकी नरेश धरे यांना ताब्यात घेतले आहे. कोर्टाने त्यांना ३० मार्चपर्यंत एटीएसची कोठडी सुनावली आहे.
अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह काहीच दिवसात सापडला होता. त्यांच्या हत्येचा तपास एटीएसकडून केला जात होता. मात्र कालच हा तपास देखील एनआयएकडे देण्याचे निश्चित झाले होते. परंतु एनआयए कडून या प्रकरणाचा ताबा घेण्याआधीच एटीएसने आणखी दोघांना अटक केली आहे. यात पोलिस दलातील निलंबित कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि एक बुकी नरेश धरे यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
‘धनानंदां’च्या कचाट्यातून सुटकेसाठी धडपडणारा महाराष्ट्र
पवारांच्या पत्रकार परिषदेवर विरोधकांचे टीकास्त्र
पवार साहेब विंडो ड्रेसिंग नको, गृहमंत्र्यांचा राजीनामा हवा
एटीएसने ठाणे कोर्टात याबाबत अहवाल सादर केला आहे. कोर्टाने दोघांनाही ३० मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.
नितेश राणे यांनी यापुर्वी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे याचा बुकींशी संबंध असल्याचे सांगितले होते. याप्रकरणात एका बुकीला अटक करण्यात आल्याने या प्रकरणातील बुकींशी असलेला संबंध उघड झाला आहे.
नेहमीप्रमाणे एटीएस ची कार्य पद्धती आहे. खरे आरोपी सापडत नसतील, आरो़पी माहितीतील असतील, आरोपींवर काही कारणास्तव पकडू शकत नसतील, माध्यमातून व जनतेकडून बोंबाबोंब झाली. कि दाखवण्यासाठी बनावट आरोपी दाखून १४ दिवसांसाठी ताबा घ्यायचा.
गुपचुप जामीनावर सोडून द्याच. नाहीतर बड्या धेडांना वाचवण्यासाठी कोणीचा तरी बळी चढवायचा.
कालच केंद्रीय गृह विभागातील सचिवांनी मनसूख हिरेन ह्याचा संशयास्पद मृत्यु प्रकरण एन आय ए कडे देणार सांगितले. केंद्रांतून पत्र महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्री ह्यांच्या कडे पोचण्या आधींच आरोपी पकडले म्हणून दाखवलं आहे.
एटीएस पॅटर्न